सगळ्यांनाच एक गोष्ट माहिती आहे की खात्यात पैसे असेल तरच आपण पैस काढू शकतो. कारण, बऱ्याच जणांना बॅंकेच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेविषयी माहिती नसते. पण, या सुविधेचा लाभ घेऊन बॅंकेचे ग्राहक त्यांच्या खात्यात पैसे नसले तरी ते काढू शकणार आहेत. या सुविधेलाच ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणतात. तर तिचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे. याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
तुम्ही Overdraft ची सुविधा कोणत्याही बॅंकेतून घेऊ शकता. यासाठी तुमचे त्या बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे. तसेच, ते खाते तुमच्या बचत खाते किंवा चालू खाते यांच्याशी लिंक असायला पाहिजे. याशिवाय, तुम्ही किती रक्कम काढू शकता, याची लिमिट बॅंक ठरवते. यामुळे बॅंकानुसार लिमिट वेगवेगळी असू शकते. याचबरोबर, तुम्ही जेवढी रक्कम काढणार आहात. तिला एका अवधीत तुम्हाला फेडावी लागते. यावर तुम्हाला व्याज ही द्यावा लागतो आणि तो दैनिक आधारावर मोजल्या जातो.
यासाठी पात्रता काय आहे?
ही सुविधा घेणारा नागरिक हा भारताचा असायला हवा. तसेच, त्याचे वय 21 ते 65 च्यादरम्यान असणे गरजेचे आहे. याशिवाय तुमचा सिबिल स्कोअरही चांगला असायला पाहिजे. या सुविधा काही बॅंका ग्राहकाला आधीच देतात, तर काही ग्राहकांना या सुविधेसाठी अर्ज करावा लागतो. ही सुविधा घेण्यासाठी तुम्हाला सुरक्षा म्हणून काहीतरी तारण ठेवणे आवश्यक असते. तसेच, महत्वाची गोष्ट म्हणजे, ही सुविधा घेण्यासाठी बऱ्याच बॅंका प्रोसेसिंग चार्ज घेतात. त्यामुळे अर्ज करण्याआधी त्याचा चार्ज पाहणे फायद्याचे ठरेल.
ओव्हरट्राफ्ट सुविधेचा फायदा
इमर्जन्सीत बरेच जण क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोनचा पर्याय निवडतात. पण, तुम्ही ओव्हरड्राफ्टची सुविधा घेतल्यास, तुम्हाला खूप स्वस्त पडणार आहे. कारण, यामध्ये तुम्हाला व्याज कमी द्यावे लागते. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही जेवढ्याकाळासाठी पैसे घेता, तेवढ्याच काळाचे व्याज द्यावे लागते. त्यामुळे बरेच जण हा पर्याय निवडतात. तुम्हाला ही भविष्यात पैशांची गरज लागल्यास, तुम्ही देखील हा पर्याय निवडू शकता.