Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyber Fraud : सायबर फ्रॉड म्हणजे काय? ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास कुठे करायची तक्रार?

Cyber Fraud : सायबर फ्रॉड म्हणजे काय? ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास कुठे करायची तक्रार?

सायबर गुन्हेगार बनावट ईमेल, टेक्स्ट मेसेज, फोन कॉल करून एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील मिळवून त्याची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही वेळा तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून कर्ज काढणे, ऑनलाईन खरेदी करणे, किंवा बनावट इ कॉमर्स वेबसाईट तयार करून उत्पादनाची खरेदी-विक्री करण्यासाठी तुमच्याकडून बँकेचा तपशील घेऊनही फसवणूक केली जाते.

सध्याच्या डिजिटल जमा‍न्यात सायबर गुन्हेगारी (Cyber crime) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या जास्तच आहे. सायबर गुन्हेगार  इंटरनेटच्या सहाय्याने हॅकिंग, फिशिंग, स्टॅकिंग, बँकिंग फसवणूक अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून फसवणूक करतात. मात्र अशा प्रकारच्या फसवणुकीची शिकार झाल्यास तुम्हाला तक्रार कुठे करायची आहे. या बाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

सायबर फ्रॉड म्हणजे काय ?

सायबर फ्रॉड (Cyber Fraud) म्हणजे  इंटरनेटच्या माध्यमातून केलेली ऑनलाईन फसवणूक होय. यामध्ये आर्थिक फसवणुकीचा हेतूच जास्त प्रमाणात असतो. तर काहीवेळा तुमची महत्त्वाची माहिती चोरी करण्याचेही प्रकार सायबर गुन्हेगारीमध्ये दिसून येतात. सायबर गुन्हेगार बनावट ईमेल, टेक्स्ट मेसेज, फोन कॉल करून एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील मिळवून आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही वेळा तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून कर्ज काढणे, ऑनलाईन खरेदी करणे, किंवा बनावट इ कॉमर्स वेबसाईट तयार करून उत्पादनाची खरेदी-विक्री करण्यासाठी तुमच्याकडून बँकेचा तपशील घेऊन देखील फसवणूक केली जाते. 

कशी टाळाल तुमची फसवणूक?

सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक झाल्यास मोठ्या आर्थिक समस्या निर्माण होतात काही वेळा स्कॅमर तुमची आयुष्याची कमाई एका झटक्यात काढून घेतात. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही अनोळखी ईमेल, कॉलला प्रतिसाद देण्यापूर्वी आपण फसवणूकीच्या दृष्टीने जागृत राहिले पाहिजे. तसेच नवनवीन इंटरनेट, एसएमएसवर येणार्‍या डोळे चमकवणाऱ्या ऑफरचा मोह टाळता आला पाहिजे.

फसवणूक झाल्यास पुढे काय?

ऑनलाईन फसवणुक झाल्यास तुम्ही सर्वप्रथम तुमच्या बँकेला याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच फसवणूक झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत फसवणुकीची तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. यासाठी भारत सरकारच्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल या संकेतस्थळावर (https://cybercrime.gov.in/ ) तक्रार दाखल करता येते. यामध्ये तुम्हाला सायबर गुन्ह्यांची ऑनलाइन तक्रार नोंद करता येते. याच सोबत तुम्ही झालेल्या फसवणुकीची तक्रार https://www.cert-in.org.in/ या पोर्टलवरही देऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात देखील लेखी तक्रार दाखल करू शकता.

पुरावे जतन करा-

ऑनलाईन फसवणूक झाल्यास तुमच्या बँक खात्याचा तपशील काढून घ्या, तसेच तुमच्या बँकेला फसवणुकीची माहिती देऊन तुमचे सर्व व्यवहार स्थगित करा. ज्या माध्यमातून तुमची फसवणूक झाली आहे. ती माहिती जतन करा अथवा स्क्रीनशॉट काढून घ्या (इमेल, एसएमस, फोन कॉल आलेला क्रमांक) तसेच 1930 या सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधून फसवणुकीची तपशीलवार माहिती द्या.