Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ATM Withdrawal Fee: ATM वरून पैसे काढताय? मग 'या' बॅंकांचे चार्जेस जाणून घ्या

ATM Withdrawal Fee: ATM वरून पैसे काढताय? मग 'या' बॅंकांचे चार्जेस जाणून घ्या

Image Source : www.india.com

ATM Withdrawal Fee: तातडीच्या प्रसंगी पैसे काढायचे म्हटल्यावर, सर्वांत जलद पैसे ATM वरून सहज काढता येतात. पण, त्याची मर्यादा असते, ती ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी चार्ज द्यावा लागतो. आज आम्ही तुम्हाला टाॅपच्या बॅंकांच्या चार्जेसविषयी सांगणार आहोत.

पैसे सुरक्षेच्या दृष्टीने बॅंकेत ठेवणे सर्वांत चांगले. कारण, घरी जास्त पैसे ठेवण्याची जोखिम असते. पण, महत्वाच्या कामासाठी त्वरित पैसा पाहिजे असल्यास, ATM चांगला पर्याय आहे. त्यासाठी बॅंकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही कोण्याही ATM वरून सहज पैसे काढू शकता. पण, त्याची ही एक मर्यादा आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नवीनतम नियमानुसार, तुमचे निशुल्क व्यवहार वापरून झाल्यानंतर, बॅंक प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये चार्ज आकारते. बऱ्याच बॅंका महिन्याला 5 निशुल्क व्यवहार करण्याची मुभा देतात. चला तर मग कोणत्या बॅंकेची मर्यादा किती आहे जाणून घेवूया.

PNB बॅंक ATM चार्जेस

पंजाब नॅशनल बॅंक (PNB) त्यांच्या ATM वरून महिन्याला 5 निशुल्क व्यवहार करण्याची मुभा देते. ही सोय मेट्रो आणि नॉन-मेट्रो या दोन्ही भागासाठी लागू आहे. मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारासाठी 10 रुपये तसेच, त्यावर GST आकरण्यात येते. दुसऱ्या बॅंकाच्या ATM मध्ये व्यवहार केल्यास, मेट्रोसाठी 3 तर नाॅन-मेट्रो शहरासाठी 5 निशुल्क व्यवहार करता येतात. त्यांनतर प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये चार्ज आणि त्यावर GST आकारला जातो.

SBI बॅंक ATM चार्जेस

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) 25000 रुपयांच्या मासिक बॅलन्सपर्यंत बॅंकेच्या ATM वरून 5 निशुल्क वित्तीय व गैर-वित्तीय व्यवहार करता येतात. मात्र, SBI ATM ची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर 10 रुपये चार्ज घेतल्या जातो, त्यात GST ही जोडला जातो. हेच दुसऱ्या बॅंकाच्या ATM वरून व्यवहार केल्यास,  20 रुपये चार्ज आकारला जातो, त्यात GST ही जोडला जातो. जर तुमचे बॅलन्स 25000 रुपयांपेक्षा अधिक असल्यास तुम्ही निशुल्क कितीही वेळा ATM मधून पैसे काढू शकता.

ICICI बॅंक ATM चार्जेस

इंडस्ट्रीयल क्रेडिट अ‍ॅंड इनव्हेस्ट काॅर्पोरेशन ऑफ इंडिया (ICICI) बॅंकेच्या ATM मधून नाॅन-मेट्रो भागात 5 निशुल्क व्यवहार करता येतात. तर मेट्रो भागात 3 व्यवहार करण्याची मुभा आहे.  त्यानंतर, ATM वरून प्रत्येक वित्तीय व्यवहारासाठी 21 रुपये चार्ज आणि गैर-वित्तीय व्यवहारासाठी 8.5 रुपये चार्ज आकारल्या जातो.  

HDFC Bank ATM चार्जेस

हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स काॅर्पोरेशन (HDFC) बँकेच्या ATM मधून महिन्याला 5 निशुल्क व्यवहार करता येतात. याची दुसऱ्या बॅंकेसाठी मर्यादा मेट्रो भागात 3 आणि नॉन-मेट्रो भागात 5 आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर,  प्रत्येक वित्तीय व्यवहारासाठी 21 रुपये आणि प्रत्येक गैर-वित्तीय व्यवहारासाठी 8.5 रुपये आकारले जातात.

रिझर्व्ह बॅंक काय सांगते

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील वर्षी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, बँकांनी त्यांच्या बचत बँक खाते धारकांना कोणत्याही ATM वर त्याचे स्थान विचारात न घेता, एका महिन्यात कमीतकमी पाच निशुल्क व्यवहार करण्याची ऑफर दिली पाहिजे. तसेच, अन्य गैर-वित्तीय व्यवहार निशुल्क प्रदान करण्यात येईल. असे परिपत्रकात म्हटले होते. मात्र, सध्याच्या आरबीआयच्या परिपत्रकानुसार, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली या सहा मेट्रो ठिकाणी असलेल्या  ATM वर, बँका त्यांच्या बचत बँक खाते धारकांना एका महिन्यात 3 निशुल्क व्यवहार करण्याची मुभा देतील यात वित्तीय आणि गैर-वित्तीय व्यवहारांचाही समावेश असेल. त्यामुळे ग्राहकांना आता गैर वित्तीय व्यवहारांवरही चार्ज द्यावा लागू शकतो. तर नाॅन मेट्रो शहरात 5 निशुल्क व्यवहार करता येणार आहेत.