प्रत्येक बॅंका त्यांच्या वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांवर काही चार्ज आकारतात. त्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टींविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, काही जण बॅंकेत पैसे जमा झाले किंवा कटले तर त्याला ही वित्तीय व्यवहार (Banking Transaction ) मानतात. तसेच, SMS चार्ज आणि अन्य सेवा चार्ज कट होतो त्याला ही वित्तीय व्यवहार मानतात.
पण, त्याला बॅंकेच्या भाषेत वित्तीय व्यवहार मानत नाहीत. तो बॅंकेच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. जरी तुमचे खाते बंद केले तरी त्यात वेळोवेळी व्याज जमा होते आणि सेवा चार्ज कट होत राहतो. त्यामुळे वित्तीय व्यवहार आणि या सेवांचा काही संबंध नाही.
हे व्यवहार का नाहीत?
बॅंकेत खाते असल्यावर, त्याचे तुम्हाला व्याज मिळणार आहे. तसेच, तुम्हाला सेवा चार्जही द्यावा लागणार आहे. मिनिमम बॅलन्स असेल तर त्यावरही दंड द्यावा लागणार आहे. पण, या गोष्टी वित्तीय व्यवहाराच्या कॅटेगरीत येत नाहीत. कारण, यात बॅंक खातेदार किंवा दुसऱ्या व्यक्तीचा संबंध येत नाही. ही बॅंकेकडून करण्यात येणारी प्रक्रिया आहे. यामुळे बॅंकेकडून होणाऱ्या प्रक्रियेला वित्तीय व्यवहारात मानल्या जात नाही.
वित्तीय व्यवहार काय आहे?
तुम्ही जर तुमच्या खात्यातून पैसे काढले, एखाद्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले तर त्याला वित्तीय व्यवहार मानले जाते. म्हणजेच बॅंकेद्वारे तुम्ही जेही पैशांचे व्यवहार करता त्यांचा वित्तीय व्यवहारात समावेश होतो. जसे की, NEFT, RTGS, UPI, रिचार्ज, शाॅपिंग किंवा अन्य पद्धतीने केलेले पेमेंट या सर्वांना वित्तीय व्यवहार मानले जाते.
जेव्हा बॅंक तुम्हाला एटीएमसाठी एक लिमिट ठरवून देते. ती जेव्हा तुम्ही ओलांडता तेव्हा तुम्हाला चार्ज द्यावा लागतो. तोही वित्तीय व्यवहारात येतो. त्यामुळे तुम्ही किती व्यवहार करू शकता. हे तुम्हाला माहिती असल्यास, तुम्हाला वित्तीय चार्ज देण्याची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्ही त्या हिशोबाने पैसे तुमच्या एटीएमवरुन काढू शकता.
गैर-वित्तीय व्यवहार?
बॅंकेच्या तिजोरित वाढ होण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पण, याचा तुमच्या खात्यावर असलेल्या बॅलन्सवर काहीच फरक पडत नाही. म्हणजेच हा व्यवहार केल्यास, तुमच्या खात्यात पैसे येत नाहीत आणि जात नाहीत, म्हणून याला गैर वित्तीय व्यवहार मानल्या जाते. बॅंकेतील बॅलन्स तपासणे, बॅंक खात्यात माहिती अपडेट करणे, खात्याचे स्टेटमेंट पाहणे, एटीएम कार्ड, चेक बुक घेणे आदींना गैर वित्तीय व्यवहार मानले जाते.
याशिवाय बॅंकेत व्याजाचे पैसे जमा होणे किंवा अन्य चार्ज कट होणे हेही गैर-वित्तीय व्यवहारात येते. बॅंकांनी गैर वित्तीय व्यवहारांसाठी लिमिट ठरवून दिली आहे. ती पार केल्यास त्यांनतर बॅंका त्यावर चार्ज आकारतात. यासाठी त्या लिमिटनुसार तुम्ही तुमचे काम पार पाडल्यास, तुम्हाला अतिरिक्त चार्ज देण्याची गरज पडत नाही.
तुम्हाला जर वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहार काय आहे हे समजले असल्यास, तुमचे पैसे कट झाल्यावर गोंधळ उडणार नाही. तसेच, व्यवहार करताना बॅंकेची वित्तीय आणि गैर-वित्तीय व्यवहारांची लिमिट काय आहे, हेही पाहून घ्या. यामुळे तुमचे पैसे बचत व्हायला मदत होईल.