Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Momentum Trading: स्टॉक मार्केटमधील मोमेंटम ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

Momentum Treding

Image Source : www.forbes.com

Momentum Trading: शेअर बाजारात, मोमेंट म्हणजे शेअर्सच्या किंमतीत सातत्यपूर्ण वाढ किंवा घट. एखाद्या शेअरच्या किंमतीचा कल चढता किंवा घटता असेल तर या प्रक्रियेला मोमेंटम असे म्हणतात. काही गुंतवणूकदार ट्रेडिंग करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी अशा मोमेंटमचा वापर करून ट्रेडिंग करतात.

मोमेंटम ट्रेडिंग ही एक गुंतवणूक स्ट्रॅटेजी आहे. जी गुंतवणूकदार आपला नफा वाढवण्यासाठी आणि शेअरच्या किंमतीमधील बदलांचा फायदा घेण्यासाठी वापरतात. या स्ट्रॅटेजीमध्ये कमी किंमतीचा शेअर खरेदी केला जातो. त्याची किंमत वाढल्यावर विक्री करण्याऐवजी एखादा चांगल्या दर्जाचा शेअर खरेदी करुन त्याला वरच्या पातळीवर विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. 

मोमेंटम ट्रेडिंगचे फायदे पुढील प्रमाणे 

  • मोमेंटम ट्रेडिंगमध्ये कमी कालावधीत प्रचंड नफा मिळवण्याची क्षमता आहे.
  • मोमेंटम ट्रेडर्स भावनिक गुंतवणुकीमुळे होणाऱ्या शेअरच्या किंमतीतील बदलांचा फायदा घेतात.
  • मोमेंटम ट्रेडर्सना बाजारातील चढउतारांचा जास्त त्रास होत नाही.
  • मोमेंटम ट्रेडर्स शेयर बाजारातील चढउतार या दोन्ही बाजूने पैसे कमावतात.

मोमेंटम ट्रेडिंगचे तोटे

  • शेअर्सची उलाढाल फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोमेंटम ट्रेडर्सना अनेकदा जास्त ब्रोकरेज द्यावे लागते.
  • मंदीच्या बाजारपेठेत, गुंतवणूकदार सावध झाल्याने मोमेंटम ट्रेडर्सचे नफ्याचे प्रमाण कमी होते.
  • मोमेंटम ट्रेडिंगला फार वेळ द्यावा लागतो आणि गुंतवणूकदाराला दररोज बाजाराचे सूक्ष्म निरीक्षण करावे लागते.

मोमेंटम गुंतवणूकदार ‘या’ निर्देशकांचा वापर करतात

  • Stochastic oscillator
  • Relative strength index
  • Average directional movement index
  • MACD
  • Exponential function
  • On-balance volume
  • Ease of movement
  • Relative strength index (rsi)
  • Moving average convergence divergence (macd)
  • Average directional index (adx)
  • Aroon indicator

थोडक्यात काय तर, मोमेंटम ट्रेडर्सचा असा विश्वास असतो की काही काळापासून एका दिशेने फिरत असलेल्या शेयरच्या किंमती मर्यादित कालावधीसाठी त्या दिशेने पुढे जात राहतील. व त्यातून ते नफा कमवतील.