अर्जेंटिनाचा फिफा विश्वचषक विजेता स्टार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने त्याच्या संघातील प्रत्येक सदस्यासाठी आणि कतार 2022 मधील अंतिम फेरीत फ्रान्सविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा भाग असलेल्या सपोर्ट स्टाफसाठी सोन्याचे आयफोन खरेदी केले आहेत.
एका अहवालानुसार, £175,000 (अंदाजे रु. 1.73 कोटी) किमतीच्या 24-कॅरेट या स्मार्टफोन्सवर खेळाडूंची नावे, क्रमांक आणि अर्जेंटिनाचा लोगो कोरलेला आहे. मेस्सीने शनिवारी ते सर्वांना घरपोच पाठवले.
बेन लियॉन्स यांनी सुचवली कल्पना
लिओनेल मेसीला त्याचा कारकीर्दीतील हा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यासाठी काहीतरी खास आणि आनंददायी करायचे होते. यावेळी तो उद्योजक बेन लियॉन्सच्या संपर्कात आला आणि त्यांनी एकत्रितपणे या फोनचे डिझाइन तयार केले.
विश्वचषक फायनलनंतर काही महिन्यांनी मेसीने या संदर्भात आमच्याशी संपर्क साधला. बेन यांनी सांगितले की, त्याला सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी एक खास भेट हवी होती, पण त्याला नेहमीप्रमाणे घड्याळांची भेट नको होती म्हणून, मी सोन्याचे आयफोन त्यांच्या नावासह कोरलेले भेट देण्याचे सुचवले आणि त्याला ही कल्पना आवडली.”
पेनल्टीमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून अर्जेंटिनाने तिसरे विश्वचषक जिंकले आणि कर्णधार लिओनेल मेस्सीने पहिला विश्वचषक जिंकला.
अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता संघ – एमी मार्टिनेझ, फ्रँको अरमानी, जेरोनिमो रुल्ली, मार्कोस अकुना, जुआन फॉयथ, लिसांड्रो मार्टिनेझ, निकोलस टॅगलियाफिको, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, नहुएल मोलिना, गोन्झालो मॉन्टिएल, जर्मन पेझेला, एंजेल डी रो मारिया, एंजेल रो मारिया, एंजेल डी पॉल, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर, एन्झो फर्नांडीझ, एक्क्विएल पॅलासिओस, गुइडो रॉड्रिग्ज, लिओनेल मेस्सी, लॉटारो मार्टिनेझ, पाउलो डायबाला, एंजल कोरिया, ज्युलियन अल्वारेझ, थियागो अल्माडा, अलेजांद्रो गोमेझ