Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

War Impact on India: इस्त्राईल-हमास युद्धामुळे 'या' भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम, शेअर्सवर दबाव वाढला

Israel Hamas War

War Impact on India:भारत आणि इस्त्राईल यांच्या व्यापारी देवाणघेवाण आहे. मात्र हमासच्या हल्ल्याने इस्त्राईलमधील परिस्थिती बिघडली आहे. याचा फटका भारतीय कंपन्यांना बसू शकतो. भारतातून आयटी सेवा, औषधे, रसायने, रंग, दागिने यांची निर्यात केली जाते. त्यामुळे निर्यातदार कंपन्यांचे शेअर सध्या दबावात आहेत.

पॅलेस्टीनी बंडखोर हमासने इस्राईलवर हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेत युद्धाला तोंड फुटले आहे. मागील तीन दिवसांत युद्धामुळे 1100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाचे सोमवारी जगभरातील शेअर बाजारात पडसाद उमटले. भारतातील अनेक बड्या कंपन्यांची इस्त्राईलमध्ये गुंतवणूक असून युद्ध चिघळल्यास कंपन्यांच्या शेअरला फटका बसेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

इस्त्राईल आणि हमासमधील युद्धामुळे खनिज तेलाचे भाव वधारले आहेत. हे युद्ध आणखी किती काळ चालेल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र त्यामुळे आखातातील खनिज तेलाच्या उत्पादनावर परिणाम होईल, असे बोलले जाते.

भारत आणि इस्त्राईल यांच्या व्यापारी देवाणघेवाण आहे. मात्र हमासच्या हल्ल्याने इस्त्राईलमधील परिस्थिती बिघडली आहे. याचा फटका भारतीय कंपन्यांना बसू शकतो. भारतातून आयटी सेवा, औषधे, रसायने, रंग, दागिने यांची निर्यात केली जाते. त्यामुळे निर्यातदार कंपन्यांचे शेअर सध्या दबावात आहेत.

फार्मा कंपन्यांचा विचार केला तर सन फार्मा, लुपिन, डॉ. रेड्डी लॅब, टोरंट फार्मा या कंपन्यांकडून इस्त्राईलया औषधांची निर्यात केली जाते. युद्धामुळे या भारतीय कंपन्यांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सन फार्माची इस्त्राईलमधील भागीदार कंपनी टॅरो फार्माने यापूर्वीच युद्धाने व्यवसायाला मोठा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

भारतीय सर्वात मोठी आयटी सेवा पुरवठादार टाटा कन्सल्टंसीसाठी सुद्धा इस्त्राईलमधील युद्ध डोकेदुखी वाढवणारे आहे. टीसीएसकडे इस्त्राईलमधील अनेक आयटी प्रोजेक्ट्स आहेत. यात इस्त्राईल सरकारचा प्रोजेक्ट आहे. इस्त्राईलमध्ये टीएसीएसचे जवळपास 1000 कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे आव्हान कंपनीपुढे आहे.

टीसीएसबरोबरच इस्त्राईलमध्ये टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांचे देखील प्रोजेक्ट्स आहेत. या कंपन्यांच्या शेअरवर देखील युद्धामुळे दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या शनिवारी हमासने इस्त्राईलवर हल्ला चढवला होता. त्यानंतर इस्त्राईलकडून गाझा पट्टीत प्रचंड हवाई हल्ले करण्यात आले. याचा परिणाम कमॉडिटी मार्केटवर दिसून आला. ब्रेंट क्रूडचा भाव 4 डॉलरने वधारुन 88 डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे. यामुळे तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या क्षेत्रातील ओएनजीसी, ऑईल इंडिया, महानगर गॅस, रिलायन्स इंडस्ट्रीज, कॅस्ट्रॉल इंडिया हे शेअर्स पुढील काही दिवस चर्चेचा विषय ठरु शकतात.

याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल या कंपन्याचे शेअर्स ट्रेंडिंगमध्ये राहण्याची शक्यता आहे. क्रूड महागल्यास रंग आणि रसायन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. रंगाच्या निर्मितीमध्ये खनिज तेल हा कच्चा माल म्हणून वापरले जाते. रंग निर्मितीतील एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, इंडिगो पेंट्स, कन्साई नेरोलॅक हे शेअर दबावात राहण्याची शक्यता आहे.