तुम्हाला जर आयपीओ मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर सप्टेंबर महिन्यात अनेक आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी आहेत. या महिन्यात बर्याच मोठ्या कंपन्या बाजारातून पैसे उभे करण्याच्या तयारीत आहेत. आता या यादीत आणखी एका कंपनीचे नाव आले आहे. ती म्हणजे आंध्र प्रदेशातील कंपनी "वैभव जेम्स एन ज्वेलर्स". या कंपनीचा IPO 22 सप्टेंबर 2023 रोजी खुला होणार आहे.
"वैभव जेम्स एन ज्वेलर्स" ही ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे. कंपनी शेअर मार्केटमधून 210 कोटींचे नवीन शेअर्स (Fresh Equity) इश्यू करणार आहे. याशिवाय कंपनी ऑफर फॉर सेलद्वारे देखील काही शेअर्स जारी करणार आहे. जर तुम्हालाही ‘या’ आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कंपनीची सर्व डिटेल्स जाणून घ्या.
वैभव ज्वेलर्सचा आयपीओ
- कंपनी या आयपीओ मध्ये एकूण 210 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे, ज्यांचे फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर इतकी असेल.
- या आयपीओ मधील एकूण 28 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल के व्दारे कंपनीचे प्रमोटर विकणार आहे.
- मल्लिका रत्ना कुमारी एकूण 60.20 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत.
- ऑफर फॉर सेल व नवीन शेअर्स पकडून या आयपीओ ची एकुण किंमत सुमारे 270 कोटी रुपये असेल.
- गुंतवणूकदार 22 सप्टेंबरपासून या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतील.
कोणत्या गुंतवणूकदारांसाठी किती कोटा राखीव?
या 'आयपीओ'मध्ये वैभव ज्वेलर्सने क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी 50 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. तर 15 टक्के हिस्सा हाई नेट वर्थ असलेल्या व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तुम्ही 26 सप्टेंबर 2023 पर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकाल. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीचे शेअर्स 6 ऑक्टोबर 2023 रोजी NSE आणि BSE वर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक करणार असाल तर आधी प्राईस बॅंड जाणून घ्या
वैभव ज्वेलर्स आयपीओच्या प्राइस बँडबद्दल बोलायचे तर कंपनीने ते 204 ते 215 रुपयांदरम्यान निश्चित केले आहे. आयपीओची लॉट साइज किमान 69 इक्विटी शेअर्स आहे. रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14,835 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही जास्तीत जास्त 897 इक्विटी शेअर्स म्हणजेच 1,92,855 रुपये गुंतवू शकता.