Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO: पुढल्या आठवड्यात गुंतवणुकीची संधी! तीन कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार

IPO

Upcoming IPO: शेअर मार्केटमध्ये सध्या नकारात्मक वातावरण असले तरी समभाग विक्रीच्या ऑफर्स आणून भांडवल उभारण्यासाठी अनेक कंपन्या इच्छूक आहेत. त्यापैकी तीन बड्या कंपन्यांचे आयपीओ येत्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये धडकणार आहेत.

शेअर मार्केटमध्ये सध्या नकारात्मक वातावरण असले तरी समभाग विक्रीच्या ऑफर्स आणून भांडवल उभारण्यासाठी अनेक कंपन्या इच्छूक आहेत. त्यापैकी तीन बड्या कंपन्यांचे आयपीओ येत्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये धडकणार आहेत. त्यात जेएसडब्ल्यू इन्फ्रा, अपडेटर सर्व्हिसेस आणि वॅलियंट लॅबोरेटरिज या तीन शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावणार आहेत.

सप्टेंबर महिन्यातील सर्वात मोठा आयपीओ ठरणारा जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा इश्यू पुढल्या आठवड्यात खुला होणार आहे. जेएसडब्ल्यू इन्फ्रा 2800 कोटींचे शेअर इश्यू करेल. 13 वर्षानंतर जिंदाल समूहातील कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध होणार आहे. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ 25 सप्टेंबर 2023 रोजी खुला होणार आहे. 27 सप्टेंबर 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येईल. जेएसडब्ल्यू इन्फ्राच्या शेअरसाठी 113 ते 119 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

सेवा क्षेत्रातील अपडेटर सर्व्हिसेस या कंपनीची समभाग विक्री सोमवार 25 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी प्रती शेअर 280 ते 300 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. अपडेटर सर्व्हिसेस आयपीओतून 670 कोटी उभारणार आहे. कंपनीने 35% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.  

पुढल्या आठवड्यात वॅलियंट लॅबोरेटरिजचा आयपीओ 27 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. आयपीओतून कंपनी 1.08 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. यासाठी कंपनीने प्रती शेअर 133 ते 140 रुपयांचा प्राईस बॅंड ठेवला आहे. या ऑफरमध्ये 50% हिस्सा क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल इन्व्हेस्टर्स, 15% नॉन क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल इन्व्हेस्टर्स  आणि 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

सरत्या आठवड्यात सिग्नेचर ग्लोबल, साई सिल्क्स आणि मनोज वैभव जेम्स या तीन कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये पदार्पण केले होते. आयपीओच्या माध्यमातून या तीन कंपन्यांनी शेअर मार्केटमधून 2200 कोटींचे भांडवल उभारले होते.