Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO : येत्या सहा महिन्यात 38000 कोटींचे आयपीओ बाजारात धडकणार

IPO

Upcoming IPO: पहिल्या सहा महिन्यात बाजारात मॅनकाइंड फार्मा कंपनीचा इश्यू हा सर्वात मोठा इश्यू ठरला होता. मॅनकाइंड फार्माने आयपीओतून 4326 कोटींचे भांडवल उभारले होते. त्याखालोखाल जेएसडब्ल्यू इन्फ्रा या कंपनीने आयपीओतून 2800 कोटी उभारले.

चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत प्राथमिक बाजारात आयपीओंचा बोलबाला राहणार आहे. तब्बल 28 कंपन्यांचे आयपीओ पुढील सहा महिन्यात प्राथमिक बाजारात धडकणार आहेत. या कंपन्या 38000 कोटींचे भांडवल उभारणार आहेत. यामुळे प्राथमिक बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अनेक संधी निर्माण होणार आहेत. 

प्राईमडेटाबेस या कंपनीच्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 31 कंपन्यांनी शेअर बाजारातून 26300 कोटींचा निधी उभारला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहितील आयपीओंच्या संख्येत 26% घसरण झाली. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत 14 कंपन्यांनी 35456 कोटींचे भांडवल उभारले होते. 

पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत मात्र 28 कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय 41 कंपन्या सेबीच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. या कंपन्यांचे एकूण 44000 कोटींचे पब्लिक इश्यू असल्याचे प्राईमडेटाबेसने अहवालात म्हटले आहे. 

पहिल्या सहा महिन्यात बाजारात मॅनकाइंड फार्मा कंपनीचा इश्यू हा सर्वात मोठा इश्यू ठरला होता. मॅनकाइंड फार्माने आयपीओतून 4326 कोटींचे भांडवल उभारले होते. त्याखालोखाल जेएसडब्ल्यू इन्फ्रा या कंपनीने आयपीओतून 2800 कोटी उभारले. आरआर केबल्सचा 1964 कोटींचा आयपीओ होता.

आगामी सहा महिन्यांतील आयपीओंमध्ये टाटा टेक्नॉलॉजी, ओयो, जेएनके इंडिया, डोम इंडस्ट्रीज, अपीजे सुरेंद्रपार्क हॉटेल्स, ईपॅक ड्युरेबल्स, गो डिजीट इन्शुरन्स, क्रेडो ब्रॅंड्स मार्केटिंग या कंपन्यांच्या पब्लिक इश्यूचा समावेश आहे. 

टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात धडकणार आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहातून प्राथमिक बाजारात भांडवल उभारणीसाठी येणारी ही पहिलीच कंपनी आहे. त्यापूर्वी 2004 मध्ये शेअर बाजारात टाटा कन्सल्टन्सी या कंपनीने प्रवेश केला होता. आजच्या घडीला टीसीएस ही शेअर बाजारातील सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे.