टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडने इक्विटी समभागांसाठी 880 कोटींच्या आयपीओची घोषणा केली. समभाग खुली विक्री योजना गुरुवार 10 ऑगस्ट 2023 रोजी खुली होणार आहे. या योजनेत प्रति इक्विटी समभाग 187 रुपये ते 197 रुपयांदरम्यान किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी 76 इक्विटी समभागांसाठी गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. 
या ऑफरमध्ये 6000 मिलियन रुपयांपर्यंतचे इक्विटी समभाग नव्याने जारी करण्यात येणार असून 14213198 पर्यंत इक्विटी समभाग विक्रीसाठी सादर करण्यात येणार आहेत. 
आयपीओमध्ये ओमेगा टीसी होल्डिंग्स पीटीई लिमिटेड, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, कोटक स्पेशल सिच्युएशन्स फंड, टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड आणि काही समभागधारकांकडून इक्विटी समभाग विक्री केले जाणार आहेत.
टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड 25 हून अधिक देशांत व्यवसाय करत आहे. दुचाकी उत्पादनातील आघाडीच्या टीव्हीएस ग्रुपने प्रमोट केलेल्या टीव्हीएस मोबिलिटी ग्रुपची ही एक कंपनी आहे.
टीव्हीएस मोबिलिटीमध्ये एकूण चार विभाग आहेत. त्यात सप्लाय चेन सोल्युशन, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो डिलरशीप आणि सेल्स अॅंड सर्व्हिस अशा चा विभागात काम करते.
टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचीबद्ध करण्यात येणार आहे.
या ऑफरमधील कमीत कमी 75% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना ("क्यूआयबी") विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल.   
- टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडच्या प्रत्येक 1 रुपया दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सची ऑफर
- इक्विटी समभागांसाठी प्राईस बँड प्रति इक्विटी समभाग 187 रुपये ते 197 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
- अँकर गुंतवणूकदारांना बुधवार 9 ऑगस्ट 2023 रोजी बोली लावता येणार.
- ऑफर खुली होण्याची तारीख - गुरुवार 10 ऑगस्ट 2023
- ऑफर बंद होण्याची तारीख - सोमवार, 14 ऑगस्ट 2023
- कमीत कमी 76 शेअर्ससाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास 76 च्या पटीत बोली लावता येईल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            