टीव्हीएस सप्लाय चेन आयपीओमध्ये अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना आज 19 ऑगस्ट 2023 रोजी शेअरचे वाटप झाले आहे. डिमॅट खात्यात शेअर प्राप्त झाले आहेत की नाही याचा स्टेटस गुंतवणूकदारांना ऑनलाईन तपासता येणार आहे.
टीव्हीएस सप्लाय चेनचा आयपीओ 10 ते 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान खुला झाला होता. यासाठी कंपनीने प्रति शेअर 187 ते 197 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ 2.85 पटीने सबस्क्राईब झाला होता. यात क्वालिफाईड संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 1.37 पटीने सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 7.89 पटीने सबस्क्राईब झाला होता.
कंपनीच्या आयपीओला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने ग्रे मार्केटमध्ये टीव्हीएस सप्लाय चेनच्या शेअर प्रिमीयममध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांत शेअर प्रीमियममध्ये घसरण सुरु आहे.
सध्या ग्रे मार्केटमध्ये टीव्हीएस सप्लाय चेनचा शेअर प्रीमियम केवळ 2 रुपये इतका आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट 2023 रोजी प्रीमियम 22 रुपयांवर गेला होता. शेअर प्रीमियम कमी झाल्याने टीव्हीएस सप्लाय चेनची लिस्टींग आयपीओत निश्चित केलेल्या किंमतीच्या जवळपास होण्याची शक्यता शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
टीव्हीएस सप्लाय चेनच्या आयपीओसाठी प्रमुख ब्रोकर्सने सबस्क्राईबचा सल्ला दिला होता. कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि भविष्यातील वृद्धीच्या संधी पाहता आयपीओसाठी सबस्क्राईबचा सल्ला देण्यात आला होता. काही ब्रोकर्सनी या कंपनीचे व्हॅल्यूएशन इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचे आयपीओ टाळण्याचा सल्ला दिला होता.
टीव्हीएस सप्लाय चेनचे शेअर डिमॅट खात्यात प्राप्त झालेत की नाही हे बीएसईची वेबसाईट आणि Link Intime India Private Limited या वेबसाईटवरुन तपासता येईल.
1) BSE
- बीएसई इंडियाच्या वेबसाईटवर जा
- इश्यू प्रकारात इक्विटीची निवड करा
- टीव्हीएस सप्लाय चेन हा आयपीओ निवडा
- अॅप्लिकेशन नंबर सादर करा
- पॅनकार्डचा तपशिल सबमिट करा
- I am not Robot ला क्लिक करा
2) Link Intime India Private Limited
- Link Intime India Private Limited या कंपनीच्या वेबसाईटवर जा
- आयपीओ इश्यूची निवड करा
- अॅप्लिकेशन नंबर, डिमॅट अकाउंट किंवा पॅनकार्ड यांचा तपशिल सादर करा
- त्यानंतर ASBA आणि Non ASBA यात निवड करा
- कॅप्चा कोड सबमिट करा