Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Three Banks Cut MCLR Rates: 'या' तीन बँकांनी एमसीएलआर दर केले कमी, जाणून घ्या सविस्तर

Banks Not Hike Interest Rate

Three Banks Cut MCLR Rates: कर्ज म्हटले की ग्राहकांपुढे तडजोडीचा मोठा प्रश्न उभा राहते. मात्र कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना 3 बँकांकडून दिलासा मिळाला आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) आणि आयसीआयसीआय बँकेने (ICICI) व्याजदर न वाढविण्याची घोषणा केली आहे. एचडीएफसी (HDFC Bank) बँकेने एप्रिलमध्ये MCLR (Marginal Cost of Funds based Lending Rate) दर 0.85 टक्क्यांनी कमी केला आहे आणि मे महिन्याहतही तो दर कायम राहणार आहे

Interest Rate: घर, दुकान, जमीन, वाहन यासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना 3 बँकांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) आणि आयसीआयसीआय बँकेने (ICICI) यापूर्वी कर्जावरील व्याजदरात वाढ न करण्याची निर्णय घेतला आहे. यामुळे कर्जधारकांना महागड्या EMI च्या टेंशनमधून काहीसा दिलासा मिळेल. तर एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर म्हणून एप्रिलमध्ये काही MCLR आधारित कर्जावरील व्याजदर 0.85 टक्क्यांनी कमी केले आहे. आणि आता मे महिन्यातही तो दर कायम राहणार आहे. 

आयसीआयसीआय बँकेचा MCLR दर

ICICI बँकेने आपल्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी MCLR दर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मे 2023 साठी सुध्दा मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये बदल न करता, तोच कायम ठेवतील असे म्हटले आहे. ICICI ने एप्रिलमध्ये MCLR दर वाढविलेला नाही आणि मे महिन्यात देखील तो वाढविणार नसल्याने आधीच्या ग्राहकांना जास्त ईएमआय भरावे लागणार नाही, तर नवीन कर्जदारांना महागड्या व्याजदरांना सामोरे जावे लागणार नाही. ICICI ने रात्रभर आणि एक महिन्याचा MCLR दर 8.50 टक्के ठेवला आहे. त्यानंतर तीन महिन्यांचा MCLR दर 8.55 टक्के ठेवला आहे. सहा महिन्यांसाठी 8.70 टक्के ठेवला आहे. आणि आता एका वर्षासाठी  MCLR दर 8.75 टक्के असणार आहे.

बँक ऑफ इंडियाचा व्याजदर

बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, ते मे 2023 साठी MCLR दर वाढवत नाहीत. एका रात्रीच्या कालावधीसाठी बँकेचा MCLR 7.90 टक्के आहे. त्याच वेळी, एक महिन्याचा MCLR दर 8.10 टक्के आणि तीन महिन्यांचा MCLR 8.20 टक्के आहे. एका वर्षासाठी MCLR आता 8.60 टक्के आणि सहा महिन्यांसाठी MCLR 8.40 टक्के आहे. त्याच वेळी, बँक ऑफ इंडियाचा RBLR 9.25 टक्के लागू होईल.

एचडीएफसी बँक MCLR दर

HDFC बँकने 10 एप्रिल 2023 रोजी निवडक कालावधीसाठी 85 बेस पॉईंट्सने आपला  MCLR दर कमी केला आहे. 100 बेस पॉइंटस म्हणजे 1 टक्का होते. त्यामुळे  MCLR दर 7.80 टक्क्यांवर आला आहे. एका महिन्याचा MCLR 8.65 टक्क्यांवरून 7.95 टक्क्यांवर आला आहे. तर तीन महिन्यांसाठी  MCLR दर 8.30 टक्के करण्यात आला आहे. तर सहा महिन्यांसाठी MCLR 8.7 टक्के करण्यात आला आहे.

रेपो दरावर आधारीत व्याजदर

RBI (Reserve Bank Of India) ने फेब्रुवारी महिन्यात MPC बैठकीत रेपो दर 6.50 टक्के कायम राखण्याचा निर्णय घेतला होता. RBI ने रेपो दर कायम ठेवत कुठलिही वाढ न केल्याने बँकांच्या कर्जदरात कुठलिही वाढ झाली नाही. बँकांचे कर्ज दर म्हणजे  MCLR आणि EBLR दोन्ही RBI अहवालानुसार ठरवले जातात. त्यामुळे आरबीआयने जर का रेपो दरात वाढ केली तर कर्जाचा व्याजदर वाढते आणि मग कर्जदाराची ईएमआय रक्कम वाढते.