मेसन वाल्व्ह इंडिया लिमिटेडला पूर्वी सँडर मेसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जायचे. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उद्योगांना वॉल्व, अॅक्ट्युएटर, स्ट्रेनर्स आणि रिमोट-कंट्रोलचा पुरवठा करते. आयपीओद्वारे या कंपनीने शुक्रवारी 30.48 लाख इक्विटी शेअर्स जारी केले होते. त्यापैकी 1.59 कोटी रुपयांचे 1.56 लाख शेअर्स विशिष्ट गुंतवणूकदारांसाठी राखीव होते.
कंपनीचे आर्थिक रिजल्ट चांगले आहेत. कंपनी नफ्यामध्ये आहे. कंपनीचा व्यवसाय भारतात आणि परदेशातही पसरलेला आहे. पण आता कंपनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट वाढवणार असल्याची चर्चा आहे. ज्यामध्ये कंपनीचे नफ्याचे मार्जिन किती असेल आणि भविष्यात ते फायदेशीर राहील की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे या बातमीचा परिणाम 21 सप्टेंबर रोजी आयपीओच्या लिस्टिंगवर होण्याची शक्यता आहे.
मेसन वाल्व्ह IPO चे उद्दिष्टे
- उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी प्लांट आणि यंत्रसामग्रीची खरेदी.
- कार्यरत भांडवलाची आवश्यकता आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वित्तपुरवठा.
मेसन वाल्व्ह IPO साठी महत्वपूर्ण तारखा
- IPO उघडण्याची तारीख - 08 सप्टेंबर 2022
- IPO बंद होण्याची तारीख - 12 सप्टेंबर 2022
- शेअर वाटप - 15 सप्टेंबर 2022
- पैसे परतावा - 18 सप्टेंबर 2022
- डिमॅट खात्यात शेअर हस्तांतरण करण्याची तारीख - 20 सप्टेंबर 2022
- शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची तारीख - 21 सप्टेंबर 2022
कोणत्या गुंतवणूकदारांसाठी किती कोटा राखीव?
आयपीओचा फक्त अर्धा भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होता. उर्वरित 50 टक्के हाई नेटवर्थ इंडिविजुअल आणि इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स साठी राखीव होता; म्हणजे 14.46 लाख शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)