Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Price: या फूड डिलेव्हरी कंपनीचा शेअर 4 दिवसांपासून तेजीत; किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

Zomato Share Price Hike

Share Price: सध्या भारतात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. यामुळे फूड डिलेव्हरी करणाऱ्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली उसळी आली आहे. हा शेअर मागील 4 दिवसांपासून तेजीत असून बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) तो 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

Share Price: शेअर मार्केटमधील कंपन्यांवर कोणत्या गोष्टीचा कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो. याचा अंदाज बांधणे कठिण आहे. सध्या भारतात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. यामुळे फूड डिलेव्हरी करणाऱ्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली उसळी आली आहे. हा शेअर मागील 4 दिवसांपासून तेजीत असून बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) तो 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

क्रिकेट हा तसा भारतीयांचा आवडता खेळ. पण मागील काही वर्षांच्या तुलनेत त्याची लोकप्रियता पूर्वीसारखी राहिली नसल्याचे दिसून येते. तरीही त्याचा परिणाम मार्केटवर होताना दिसून येत आहे. फूड डिलेव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीचा शेअर 29 सप्टेंबरपासून तेजीत आहे. या शेअरला खरेदीदारांकडून चांगलीच पसंती मिळत असून त्याने काल 52 आठवड्यांचा उच्चांक मोडला गाठला आहे. मागील आठवड्याचा विचार करता झोमॅटोच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांपर्यंत तेजी आली आहे.

zomato share price hike
Source: www.money.rediff.com

वर्ल्ड कपमुळे शेअर्समध्ये आणखी वाढ होणार!

गुरूवारी सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर झोमॅटोची ओपनिंग 110.20 अंकावर झाली. काल तो 109 अंकावर बंद झाला होता. वर्ल्ड कपच्या मॅचेसमुळे हा शेअर पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वर्ल्ड कपमधील सामन्यांची रंगत जशी वाढेल तसेच या शेअरमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या मॅचेस असणाऱ्या दिवशी या शेअर्समध्ये वाढ होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

मार्केट कॅप 93,831.48 कोटींवर

बुधवारी दिवसभरात झोमॅटोच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. त्याचदरम्यान हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मागील 52 आठवड्यातील या शेअर्सचा निच्चांक पाहिला तर तो 44.35 रुपये इतका होता. जानेवारी, 2023 मध्ये तो इतक्या खाली आला होता. त्यानंतर आजपर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना जवळपास 145 टक्क्यापर्यंत रिटर्न्स दिले आहेत. यातून कंपनीला 7100 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तर कंपनीचे बाजारातील भांडवल 93,831.48 कोटींवर पोहोचले आहे.

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)