Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swiggy IPO:फूड डिलिव्हरी स्टार्टअप स्वीगीचे IPO साठी प्रयत्न सुरु , वर्ष 2024 मध्ये शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार

IPO

Image Source : www.cnbctv18.com

Swiggy IPO: झोमॅटोच्या यशस्वी IPO नंतर स्वीगीने देखील आयपीओची तयारी केली होती. मात्र त्यावेळी शेअर बाजारात पडझड सुरु होती. अशा नकारात्मक वातावरणात आयपीओला फटका बसू नये म्हणून कंपनीने भांडवल उभारणीची योजना स्थगित केली होती.

फूड डिलिव्हरी स्टार्टअप स्वीगीला शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्याचे वेध लागले आहेत. शेअर मार्केटमधील घसरणीने वर्ष 2022 मध्ये स्वीगीने आयपीओ स्थगित केला होता. मात्र आता पुन्हा नव्याने प्रयत्न सुरु केले आहेत. कंपनीने बाजार मूल्य ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

झोमॅटोच्या यशस्वी IPO नंतर स्वीगीने देखील आयपीओची तयारी केली होती. मात्र त्यावेळी शेअर बाजारात पडझड सुरु होती. अशा नकारात्मक वातावरणात आयपीओला फटका बसू नये म्हणून कंपनीने भांडवल उभारणीची योजना स्थगित केली होती.

वर्ष 2022 मध्ये आयपीओसाठी तयारी करत असताना स्वीगीचे मूल्यांकन 10.7 बिलियन डॉलर्स इतके होते. आता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बँका आणि व्हॅल्यूअर्सकडून कंपनीने नव्याने व्हॅल्यूएशन करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

स्वीगीकडून किमान 8000 कोटींचा आयपीओ बाजारात आणला जाण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर 2024 मध्ये स्वीगीचा आयपीओ शेअर मार्केटमध्ये दाखल होऊ शकतो, असे सूत्रांनी म्हटले आहे. मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका असल्याने त्याचे परिणाम शेअर मार्केटवर दिसून येतील. त्यामुळे आयपीओ त्यानंतर बाजारात येईल, असे बोलले जाते.

मागील महिनाभरात भारतीय शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजार सुस्थितीत आहेत. त्यामुळे आयपीओसाठी पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे किमान सात ते आठ बड्या बँकर्सला स्वीगीने संपर्क केला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्वीगीकडून आयपीओची प्रक्रिया सुरु केली जाण्याची शक्यता आहे.

स्वीगीने नुकताच फूड डिलिव्हरी बिझनेसमधून नफा कमावला असल्याचे जाहीर केले होते. फूड डिलिव्हरी मागील 9 वर्षांपासून सुरु आहे. स्वीगीने याव्यतिरिक्त किराणा मालाची वाहतूक, इन्स्टामार्ट या सेवा देखील सुरु केल्या आहेत.