Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Utkarsh Small Finance Bank IPO: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर वाटप झाले, असा चेक करा Allotment Status

IPO

Allotment Status: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या 500 कोटींच्या आयपीओ योजनेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप करण्यात आले आहे. तुम्ही जर या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला शेअर प्राप्त झाले की नाही हे ऑनलाईन चेक करता येणार आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या 500 कोटींच्या आयपीओ योजनेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप करण्यात आले आहे. कंपनीकडून आज बुधवारी 19 जुलै 2023 रोजी शेअर अ‍ॅलॉटमेंट पूर्ण करण्यात आली. तुम्ही जर या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला शेअर प्राप्त झाले की नाही हे ऑनलाईन चेक करता येणार आहे.  

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेकडून शेअर विक्रीतून 500 कोटींचे भांडवल उभारले जाणार आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान आयपीओसाठी अर्ज करण्याची मुदत होती. बँकेच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 1032 पटीने ओव्हरसबस्क्राईब झाला आहे. याचा अर्थ एका शेअरसाठी 102 जणांनी मागणी केली आहे. येत्या सोमवारी 24 जुलै रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

या आयपीओमध्ये बँकेने प्रती शेअर 23 ते 25 रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. आजच्या शेअर वाटपात गुंतवणूकदारांना प्रत्येक लॉटमध्ये  600 शेअर्स प्राप्त होणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 15000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. यात एक गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट्स अर्थात 1.95 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची संधी होती.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेविषयी

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही उत्तर भारतातील वेगाने वाढणारी बँक आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2015 मध्ये उत्कर्ष कोअरइन्व्हेस्ट या कंपनीला स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना दिला होता. जानेवारी 2017 पासून बँकेने प्रत्यक्ष बँकिंग सेवेला सुरुवात केली होती.  बँकेचे वाराणसीमध्ये मुख्यालय असून बँकेने आर्थिक वर्ष 2019 ते 2023 या वर्षाच 6000 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. सध्या 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा विस्तार आहे. बँकेचे 830 आउटलेट्स असून 15424 कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. मार्च 2023 अखेर 35 लाख 90 हजार ग्राहक आहेत.

ग्रे मार्केटमध्ये बँकेच्या शेअरवर 16 रुपयांचा प्रीमियम

आयपीओसाठी तुफान प्रतिसाद मिळाल्याने ग्रे मार्केटमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर तेजीत आहे. मंगळवारी 18 जुलै रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरवर 16 रुपयांचा प्रीमियम होता. ग्रे मार्केटचा ट्रेंड पाहता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर 60% प्रीमियमसह शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे.

अशा चेक करा अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर अ‍ॅलॉटमेंट स्टेटस गुंतवणूकदारांना ऑनलाईन चेक करता येईल. मुंबई शेअर बाजाराच्या वेबसाईटवर या आयपीओची माहिती मिळेल. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आयपीओचे व्यवस्थापन केफिन टेक्नॉलॉजी या कंपनीकडून केले जाते. या कंपनीच्या वेबपोर्टलवर देखील गुंतवणूकदारांना अ‍ॅलॉटमेंट स्टेटस तपासता येणार आहे.

बीएसई वेबसाईटवरुन स्टेट्स चेक करा

- बीएसईच्या वेबसाईटवर जा
- इन्व्हेस्टर सर्व्हिसचा पर्याय निवडा. 
- इश्यूचा प्रकार निवडा. त्यात इक्विटीची निवड करा. 
- या पर्यायात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या आयपीओची निवड करा. 
- पॅनकार्डचा तपशील सादर करा. 
- व्हेरिफिकेशन झाले की तुम्हाला अ‍ॅलॉटमेंट स्टेटसचा तपशील दिसेल.

KFin Techonologies वेबसाईटवरुन तपासू शकता 

- KFin Techonologies च्या वेबसाईटला भेट द्या. 
- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आयपीओची निवड करा. 
- पॅनकार्डचा तपशील सादर करा.
- कॅप्चाची निवड करा. 
- सबमिट केल्यावर तुम्हाला अ‍ॅलॉटमेंट स्टेटस कळेल.