Saving Bank Accounts: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक स्टेट बँक इंडिया (State Bank of India-SBI) बचत खात्यावर 2.70 टक्के व्याज देत आहे. तर प्रायव्हेट सेक्टरमधील नावाजलेली ICICI बँक सेव्हिंग अकाउंटवर 3 ते 3.50 टक्के यादरम्यान व्याज देत आहे. तर दुसरीकडे आरबीएल बँक एका लाखाच्या रकमेवर वर्षाला 4.25 टक्के व्याज देत आहे.
आरबीएल बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे. नवीन व्याजदर 21 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. RBL बँकेने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदरात टक्क्यांनी वाढ केली. ही वाढ बँकेने 25 लाखापेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांच्या रकमेवर केली आहे. या दरम्यान असलेल्या रकमेवर ग्राहकांना नवीन दरानुसार 7.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. 10 ते 25 लाख रुपये बचत खात्यात असल्यास त्यावर 6 टक्के व्याज दिले जात आहे.
Table of contents [Show]
बचत खात्यावर 7 टक्क्यापर्यंत व्याज देणाऱ्या बँका
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यात 5 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर 7 टक्के व्याज देत आहे. तसेच 5 लाखापेक्षा कमी आणि 1 लाखापर्यंतच्या रकमेवर 6.75 टक्के व्याज देत आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank)
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यातील 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.5 टक्के व्याज देत आहे. तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात असेल तर ग्राहकांना 5.25 टक्क्यापर्यंत व्याज दिले जात आहे आणि 5 लाखापेक्षा जास्त रकमेवर बँक 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank)
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यातील 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिकच्या रकमेवर 7.11 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. तर 1 ते 5 लाख या दरम्यानच्या रकमेवर ग्राहकांना 6.11 टक्के व्याज दिले जात आहे.