MCLR Rate Hike: देशातील बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक या मोठ्या बँकांनी आपला MCLR दर वाढविला आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR दर वाढल्याने त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. कारण कोणतीही बँक यानुसारच कर्ज निधारित करीत असते. MCLR दरात वाढ केल्याने या बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्ज दरात वाढ करण्यात आली आहे.
Table of contents [Show]
MCLR म्हणजे काय?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बँकांचा किमान कर्ज दर आहे. या दरापेक्षा कमी दराने बँकांना कर्ज देण्याची परवानगी नाही. एमसीएलआर या नवीन प्रणालीमुळे व्यावसायिक बँकांसाठी कर्जाचे दर निश्चित करण्याची पद्धत बदलली. आरबीआयने (RBI) 1 एप्रिल, 2016 रोजी MCLR ही प्रणाली लागू केली. बँका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात, हे निर्धारित करण्यासाठी ही प्रणाली ठरवण्यात आली आहे.
बँक ऑफ इंडिया एमसीएलआर दर
बँक ऑफ इंडियाने काही ठराविक कालावधी करीता एमसीएलआर दर वाढविले आहे. बँक ऑफ इंडियाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार BOI ने एक महिन्याचा MCLR दर 8.15%, तीन महिन्याचा MCLR दर 8.30% आणि सहा महिन्यांचा MCLR दर 8.50% वाढविला आहे. तर एका वर्षांसाठी 8.70% आणि तीन वर्षांसाठी 8.90% दर वाढविण्यात आला आहे.
पंजाब नॅशनल बँक एमसीएलआर दर
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ऑगस्ट महिन्यासाठी MCLR दरात कोणताही बदल केलेला नाही. PNB बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्याचे MCLR दर 8.20 % आहे, तर तीन महिन्यांसाठीचे MCLR दर 8.30 % आणि सहा महिन्यांसाठी MCLR दर 8.50 % आहे. एका वर्षासाठी MCLR दर आता 8.60 % आणि तीन वर्षांसाठी 8.90 % आहे.
आयसीआयसीआय बँकचे एमसीएलआर दर
आयसीआयसीआय बँकेने दिर्घ कालावधी करीता एमसीएलआर दर वाढविला आहे. बँकेने हा दर 5 bps ने वाढवला आहे. ICICI बँकेने एक महिन्याचा एमसीएलआर दर 8.35 टक्क्यांवरुन 8.40 % करण्यात आला आहे. तर तीन महिन्यांचा एमसीएलआर दर 8.45 % आणि सहा महिन्यांसाठी 8.80 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाचा एमसीएलआर दर 8.85 टक्क्यांवरुन 8.90 टक्के करण्यात आला आहे.