Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SME IPO: शेअर मार्केटमध्ये भांडवल उभारणीसाठी छोट्या कंपन्यांची भाऊगर्दी, पुढील आठवड्यात 12 SME IPO खुले होणार

SME IPO

SME IPO: मागील काही वर्षात SME IPO मंचावरुन अनेक कंपन्यांनी आयपीओतून भांडवल उभारले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना देखील मालमाल केले आहे.

बड्या कंपन्यांप्रमाणेच छोट्या कंपन्यांना भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी बीएसई आणि एनएसईवर SME IPO हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात 12 SME IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे.

मागील काही वर्षात SME IPO मंचावरुन अनेक कंपन्यांनी आयपीओतून भांडवल उभारले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना देखील मालमाल केले आहे. अनेक एसएमई आयपीओंनी लिस्टिंगमध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. त्यामुळे एसएमई आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

लघु आणि मध्यम श्रेणीतील कंपन्यांच्या श्रेणीत विष्णूसूर्या प्रोजेक्ट्स हा 50 कोटींचा आयपीओ पुढील आठवड्यात शेअर बाजारात खुला होणार आहे. 29 सप्टेंबर 2023 पासून विष्णूसूर्या प्रोजेक्ट्सची शेअर विक्री सुरु होईल.  

त्यापूर्वी 25 सप्टेंबर 2023 रोजी 5 एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यात अरेबियन पेट्रोलियम, न्यूजैसा टेक, इन्स्पायर फिल्म्स, साक्षी मिडटेक आणि डिजीकोर स्टुडिओज या पाच आयपीओंचा समावेश आहे.

अरेबियन पेट्रोलियम आयपीओमधून 20.2 कोटी उभारणार आहे. न्यूजैसा टेकचा आयपीओ 39.9 कोटींचा असेल. इन्स्पायर फिल्म्सचा आयपीओ 21.2 कोटींचा असून साक्षी मिडियाटेकचा इश्यू 45.16 कोटींचा आहे. डिजीकोर स्टुडिओज या कंपनीचा आयपीओ 30.48 कोटींचा आहे.

याशिवाय एसएमई आयपीओमध्ये सुनिता टूल्स, गोयल सॉल्ट या कंपन्या पब्लिक इश्यू आणणार आहेत. या कंपन्यांचे इश्यू 26 सप्टेंबर 2023 रोजी खुले होतील. कॅनरेज ऑटोमेशन , वनक्लिक लॉजेस्टिक, विनयाज इनोव्हेटिव्ह टेक आणि ई-फॅक्टर एक्सपिरिअन्स या कंपन्यांचे एसएमई आयपीओ 27 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुले होतील.

SME IPO म्हणजे काय?

लघु आणि मध्यम श्रेणीतील कंपन्या ज्यांचे भांडवल 1 ते 25 कोटी या दरम्यान आहे अशा कंपन्यांना एसएमई प्लॅटफॉर्मवर आयपीओच्या माध्यमातून निधी उभारता येतो. मात्र एसएमई आयपीओमध्ये एक लॉट 1400 ते 1600 शेअर्सचा असतो. यासाठी गुंतवणूकदारांना किमान 1 लाख ते 1 लाख 30 हजार इतकी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे प्राथमिक बाजारातील आयपीओंपेक्षा एसएमई आयपीओसाठी किमान 10 पट अधिक गुंतवणूक करावी लागते.