Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Weekly Review: आठवडाभरात सेन्सेक्सने 1530 अंक गमावले, गुंतवणूकदारांचे 6.86 लाख कोटींचे नुकसान

Share Market Fall

Share Market Weekly Review:शेअर मार्केटसाठी चालू आठवडा प्रचंड निराशाजनक ठरला. सरत्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. वाढती महागाई आणि व्याजदर वाढीचे परिणाम बाजारावर दिसून आले. आठवडाभरात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 1530 अंकांची घसरण अनुभवली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 475 अंकांनी कोसळला. आठवडभर झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे 6.86 लाख कोटींचे नुकसान केले.

शेअर मार्केटसाठी चालू आठवडा प्रचंड निराशाजनक ठरला. सरत्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. वाढती महागाई आणि व्याजदर वाढीचे परिणाम बाजारावर दिसून आले. आठवडाभरात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 1530 अंकांची घसरण अनुभवली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 475 अंकांनी कोसळला. आठवडभर झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे 6.86 लाख कोटींचे नुकसान केले.

यापूर्वी 16 फेब्रुवारी 2023 रोजी शेअर निर्देशांकात वाढ झाली होती. मात्र त्यानंतर सुरु झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. शुकवारी 24 फेब्रुवारी 2023 रोजी सेन्सेक्स 141 अंकांनी घसरला आणि तो 59463.93 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45.45 अंकांच्या घसरणीसह 17465.80 वर बंद झाला. शुक्रवारच्या सत्रात मेटल, ऑटो, कॅपिटल गुड्स या क्षेत्रात प्रचंड घसरण झाली. बीएसई मेटल इंडेक्स 484 अंकांनी घसरला. ऑटो इंडेक्स 294 अंकांनी आणि कॅपिटल गुड्स इंडेक्स 238 अंकांनी घसरला.

शेअर मार्केटमध्ये 17 फेब्रुवारीपासून सहा सत्रात सेन्सेक्समध्ये 1855.58 अंकांची घसरण झाली. याच काळात निफ्टीने 570.05 अंकांची घसरण नोंदवली. या सहा सत्रात 8.30 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे सेन्सेक्स 59500 अंकांच्या पातळीखाली घसरला. निफ्टीने 17500 अंकांची पातळी तोडली. यात महिंद्रा अॅंड महिंद्राचा शेअर 2.5%, टाटा स्टील 1.9%, टाटा मोटर्सचा शेअर 1.3% आणि एलअॅंडटीचा शेअर 1.2% घसरण झाली. याच आठवड्यात एशियन पेंट, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

बीएसईतील कंपन्यांची मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. 24 फेब्रुवारी 2023 अखेर बीएसईमधील कंपन्यांचे बाजार भांडवल 686313.35 कोटी इतके आहे. मिडकॅप कंपन्यांचे बाजार भांडवल 268.31 लाख कोटी इतके आहे. त्यात 830322.61 कोटी इतकी घसरण झाली.

मागील आठ महिन्यात सर्वाधिक घसरणीचा हा आठवडा ठरला आहे. बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवला. एनएसईच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1470.34 कोटी शेअर्सची विक्री केली. दुसऱ्या बाजूला स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार मात्र बाजारातले खरेदीदार राहिले. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आठवडाभरात 1400.98 कोटींची खरेदी केली. चालू वर्षात आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून 45973.6 कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे.

काय म्हणतात शेअर बाजार विश्लेषक

शेअर बाजारात आणखी किती काळ घसरण कायम राहिल याबाबत विश्लेषकांमध्ये मतमतांतरे आहेत. सॅमको सिक्युरिटीजचे टेक्निकल अॅनलिस्ट रोहन पाटील म्हणाले की निफ्टीमधील घसरणीने बाजारात मंदीचा प्रभाव कायम असल्याचे दिसून आले. सलग सातव्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली. यापूर्वीच्या तीन आठवड्यात बाजारात नकारात्मक परिस्थिती होती. अमेरिकेतील वाढती महागाई, चीन आणि अमेरिकेतील तणाव यामुळे जगभरात पडसाद उमटले. महागाई आटोक्यात न आल्यास फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढ सुरुच ठेवली जाईल, असे संकेत आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे शेअर बाजार विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते निफ्टीला नजीकच्या काळात 17450 ते 17500  अंकांच्या पातळीवर सपोर्ट आहे. त्याखाली आल्यास तो 17421 अंकांपर्यंत खाली घसरेल. बाजारात नकारात्मक घडामोडींचा प्रभाव असल्याने आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निफ्टी 17353 अंकांपर्यंत खाली येऊ शकतो. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी नकारात्मक परिस्थितीत कायम राहील.