Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Fall: शेअर बाजारातील घसरणीने गोंधळून गेलात, काळजी करु नका 'या' पाच गोष्टी टाळा

Sensex Fall

Image Source : www.bloomberg.com

Share Market Fall: बाजारात दररोज घसरण होत असल्याने अनेकांचे पोर्टफोलिओ आता नुकसान दाखवत आहेत. शेअर बाजारात शुक्रवारी 18 ऑगस्ट 2023 रोजी सेन्सेक्स 202 अंकांनी घसरुन 64948.66 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 55 अंकांच्या घसरणीसह 19310.15 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारातील घसरण काही केल्या थांबवण्याचे नाव घेत नाही. सलग चौथ्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत घसरण झाली. यामुळे सामान्य गुंतवणूकदार गोंधळून गेला आहे. मात्र काही बेसिक नियम पाळले तर या पडझडीच्या काळात गुंतवणूदारांना नकळत होणाऱ्या चुका टाळता येऊ शकतात.

जगभरातील सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ, महागाईचा आगडोंब, खनिज तेलाची भाववाढ यामुळे सध्या जागतिक पातळीवर नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे.

बाजारात दररोज घसरण होत असल्याने अनेकांचे पोर्टफोलिओ आता नुकसान दाखवत आहेत. शेअर बाजारात शुक्रवारी 18 ऑगस्ट 2023 रोजी सेन्सेक्स 202 अंकांनी घसरुन 64948.66 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 55 अंकांच्या घसरणीसह 19310.15 अंकांवर बंद झाला.

30 जून 2023 नंतर सेन्सेक्स प्रथमच 65000 अंकांखाली बंद झाला. निफ्टीने 19300 अंकांची पातळी तोडली. आठवड्याचा विचार केला तर सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग चौथ्या आठवड्यात घसरण अनुभवली.

बाजारात घसरणीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी गुंतवणूकदारांनी या टिप्स फॉलो केल्या तर घाईगडबडीत घेतले जाणारे चुकीचे निर्णय टाळता येतील.

घाबरुन शेअरची विक्री करु नका

शेअर मार्केटमध्ये घसरण सुरु झाली की सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार देखील घाबरुन स्वत:कडील शेअर्सची विक्री करुन मोकळा होता. इतरांप्रमाणे पडत्या बाजारात शेअर्सची खालच्या पातळीवर विक्री करुन गुंतवणूकदार स्वत:चेच आणखी नुकसान करतो. वास्तविक असा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. पडझडीच्या काळात तुमच्याकडील कंपन्या जर मजबूत असतील तर तुम्हाला फार नुकसान सोसावे लागणार नाही. तुम्ही अशा परिस्थितीत विक्री न करता ठाम राहणे आवश्यक आहे.

अ‍ॅव्हरेज करण्याची रणनिती अंमलात आणा  

जेव्हा शेअर मार्केटमध्ये घसरण होते तेव्हा शेअर्सच्या किंमतींमध्ये मोठी पडझड झाल्याचे दिसून येते. अशा काळात तुम्ही आणखी खरेदी करुन शेअर्समध्ये अ‍ॅव्हरेज करु शकता. पडत्या बाजारात थोडीफार खरेदी करुन तुम्ही अॅव्हरेज करु शकता.

बाजारातील तळ केव्हा असेल याचा अंदाज घ्या

बाजारात दिर्घकाळ सुरु असलेली घसरण कधी थांबेल याबाबत अंदाज घ्या. बाजारात जोवर एखादी महत्वाची घडामोड घडत नाही तोवर पडझड थांबत नाही. त्यामुळे बाजारातील तळ केव्हा असेल याचा अंदाज घेऊन गुंतवणूक करण्याचे धाडस करायला हवे. यामुळे तुम्ही पोर्टफोलिओ सुधारु शकता. तळातून जेव्हा बाजार झेप घेईल तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला अधिक होईल.

कठोर निर्णय टाळा

अनेकदा बाजारात पडझड सुरु असते तेव्हा गुंतवणूकदाराने निर्णयाच्या बाबत लवचिक राहणे आवश्यक आहे. मात्र त्याऐवजी निर्णयाच्या बाबतील कठोर राहतात. कठोर दृष्टीकोन काहीवेळा अडचणीचा ठरु शकतो. पोर्टफोलिओला पडझडीच्या काळात संतुलित ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांनी लवचिक राहणे आवश्यक आहे.

सगळंच सरळधोपट खरेदी करण्याचा मोह नको  

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने त्याच्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे. जे उद्दिष्ट ठरवले आहे त्यानुसार गुंतवणूक रणनिती असणे आवश्यक आहे. समोर जे दिसेल ते सर्वच खरेदी करणे हा दृष्टीकोन घातक ठरु शकतो. अनेकदा मार्केटमध्ये मोठी घसरण झाली की चांगले शेअर्स आकर्षक किंमतीत उपलब्ध होतात मात्र खरेदीचा मोह टाळणे आवश्यक आहे.