SBI च्या रिकरिंग डिपाॅझिट योजनेत तुम्ही आत्ता गुंतवणूक करायाच विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ ठरणार आहे. कारण, SBI ज्येष्ठ नागरिकांना आरडीवर 7.00 टक्के ते 7.50 टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. हेच सामान्यांना 6.50 टक्के ते 6.80 टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. या योजनेद्वारे तुम्हाला कमीतकमी 100 रुपये महिन्याकाठी गुंतवावे लागणार आहेत.
पाच वर्षांत मिळेल जबरदस्त रिटर्न
तुम्ही SBI च्या आरडीमध्ये 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत मुदतीमध्ये पैसे ठेवू शकता. तसेच, आरडीत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदारांना महिन्याला बॅंक खात्यात पैसे जमा करणे आवश्यक आहे. गुंतवणुकदार 5,000 हजार रुपयांपासूनही गुंतवणुकीची सुरुवात करु शकणार आहेत.
यासाठी त्यांना पाच वर्षाचा अवधी निवडता येणार आहे. 5,000 हजार त्यांनी महिन्याला गुंतवले तर त्यांना यावर 6.50 टक्के व्याज मिळेल. तसेच मूळ रकमेवर दरवर्षी चक्रवाढ व्याजही वाढत राहिल. त्यामुळे गुंतवणुकदारांना 5 वर्षांनंतर 54,957 रुपये व्याज मिळेल.
SBI च्या आरडीवरील व्याजदर
SBI 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या आरडीवर 6.80 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या मुदतीसाठी 7.30 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच, 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या आरडीवर 7.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 व्याज मिळत आहे.
तर 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या आरडीवर 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.00 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय 5 वर्ष आणि 10 वर्षांपर्यंतच्या आरडीवर 6.50 टक्के व्याज मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. त्यामुळे तुम्हाला जी मुदत योग्य वाटते त्या ठिकाणी तुम्ही सहज गुंतवणूक करु शकणार आहे.
SBI आरडीविषयी महत्वाच्या गोष्टी
- जर खातेदाराने सलग सहा हप्ते भरले नाही तर त्यांचे खाते बंद करण्यात येईल आणि जी रक्कम जमा असेल ती खातेदाराला परत केली जाईल.
- खातेदार SBI च्या आरडी खात्यावर ओव्हरड्राफ्टचा लाभ घेऊ शकणार आहेत.
- पेमेंट करायला उशीर झाल्यास चार्ज आकारला जाणार आहे.
- खातेदार त्यांचे SBI मधील आरडी खाते SBI च्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करू शकणार आहेत.
- आरडी खातेदारांना युनिव्हर्सल पासबुक मिळणार आहे.
- आरडी खात्यावर मिळणारे व्याज आयकर कायदा 1961 नुसार करपात्र असेल.
- SBI आरडी खातेदारांना मॅच्युरिटीनंतर आरडी फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये ट्रान्सफर करता येणार आहे.