Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Declared Dividend: स्टेट बँकेला 16695 कोटींचा नफा, शेअरहोल्डर्सला 11.30 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर

SBI Result

SBI Declared Dividend:देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने 31 मार्च 2023 अखेर संपलेल्या तिमाहीत 16695 कोटींचा नफा झाला आहे.चौथ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 83% वाढ झाली. या बंपर नफ्यामुळे बँकेने शेअरहोल्डर्सला 11.30 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे. येत्या 14 जून 2023 रोजी डिव्हीडंडचा वाटप करण्यात येईल.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने 31 मार्च 2023 अखेर संपलेल्या तिमाहीत 16695 कोटींचा नफा झाला आहे.चौथ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 83% वाढ झाली. या बंपर नफ्यामुळे बँकेने शेअरहोल्डर्सला 11.30 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे. येत्या 14  जून 2023 रोजी डिव्हीडंडचा वाटप करण्यात येईल.

एसबीआयने आज 18 मे 2023 रोजी तिमाही निकालांची आकडेवारी जाहीर केले. जानेवारी ते मार्च या तिमाहीत बँकेला 16695 कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला 9113 कोटींचा नफा झाला होता.बँकेला मार्चच्या तिमाहीत 24621 कोटींचा परिचालन नफा झाला. त्यात 25% वाढ झाली. 

दरम्यान, आज तिमाहीत स्तरावर बँकेची कामगिरी उंचावली असली तरी शेअर बाजारात मात्र नकारात्मक परिणाम दिसून आले. आज गुरुवारी शेअर मार्केटमध्ये एसबीआयच्या शेअरला विक्रीचा फटका बसला. एसबीआयच्या शेअरमध्ये 1.42% घसरण झाली. तो 578 रुपयांवर ट्रेड करत होता.

बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये चौथ्या तिमाहीत 29% वाढ झाली आहे. एसबीआयला चौथ्या तिमाहीत 40393 कोटींचे व्याजातून उत्पन्न मिळाले. त्याआधीच्या वर्षात बँकेला इंटरेस्टमधून 31198 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

टॅक्ससाठी बँकेला चौथ्या तिमाहीत 3316 कोटींची तरतूद करावी लागली. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला 7237 कोटींची तरतूद करावी लागली होती. यंदा त्यात 54% घसरण झाली. जानेवारी ते मार्च या तिमाहीत बँकेने 1278 कोटींची बुडीत कर्जांसाठी तरतूद केली आहे. बुडीत कर्जांसाठीची तरतूद चौथ्या तिमाहीत निम्म्याने कमी झाली आहे.

चौथ्या तिमाहीत एनपीए 2.78% इतके खाली आले. डिसेंबर 2022 अखेर एनपीएचे प्रमाण 3.14% इतके होते.नेट एनपीएचे प्रमाण 0.67% इतक होते.  मार्च 2023 अखेर बँकेच्या कर्ज वितरणात 16% वाढ झाली. कर्ज वितरणाचा आकडा 32.69 लाख कोटीवर गेला. या तिमाहीत कॉर्पोरेट कर्जाच्या वितरणात 12% आणि रिटेल पर्सनल लोन वितरणात 18% वाढ झाली आहे.

वार्षिक स्तरावर 50 हजार कोटींचा नफा 

आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षात एसबीआयला 50232 कोटींचा नफा झाला आहे. बँकेच्या नफ्याने 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडला. वार्षिक आधारावर बँकेच्या नफ्यात 58% वाढ झाली. नेट इंटरेस्ट इन्कममधूल बँकेला 83713 कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यात 20% वाढ झाली.