Reserve bank Of India Ombudsman: बँकिंग आणि आर्थिक व्यवहारासंबंधित तक्रारी सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. RBI द्वारे नियमन केल्या जाणाऱ्या कोणत्याही वित्त संस्थेची तक्रार आता थेट RBI लोकपालांकडे करता येणार आहे. यात बँका, बिगर बँकिंग वित्त संस्था, क्रेडिट कंपन्या आणि पेमेंट कंपन्यांचा समावेश आहे.
कशी कराल तक्रार?
बँका किंवा इतर आर्थिक संस्थेने नागरिकांची तक्रार 30 दिवसांच्या आता सोडवली नाही तर थेट RBI लोकपाल संकेतस्थळावर तक्रार करता येईल. यामध्ये सर्व प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. (Bank complaint on RBI portal) फक्त काही तक्रारींचा अपवाद आहे. म्हणजेच त्या गोष्टींसाठी तक्रार नोंदवता येणार नाही. आरबीआयने याची एक यादी दिली आहे. ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासोबत तुम्ही पोस्टानेही तक्रार पाठवू शकता.
तक्रार कोठे कराल?
या लिंकवर जाऊन नागरिकांना बँकिंग व्यवहारासंबंधी तक्रार दाखल करता येईल. जर बँकेने तुमच्या तक्रारीला दाद दिली नसेल किंवा तुमचे समाधान झाले नसेल तर तुम्ही RBI चे दार ठोठावू शकता. वर दिलेल्या लिंकद्वारे तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. यासाठी बँकिंग व्यवहाराचे पुरावे तुम्हाला लागू शकतात. तक्रार दाखल करताना स्क्रीनशॉट, डॉक्युमेंट अपलोड करता येईल.
तक्रार करण्याची प्रक्रिया?
सर्वप्रथम तुम्हाला तुमचे लॉग इन खाते तयार करावे लागेल. तुमची माहिती यात अपडेट करावी लागेल.
तुमची तक्रार नक्की कोणाविरुद्ध आहे तो पर्याय स्वीकारावा लागेल. जसे की, बँक, सहकारी बँक, फायनान्स कंपनी, पेमेंट कंपनी, क्रेडिट संस्था इ.
वरीलपैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्यवहाराचा तपशील द्यावा लागेल. आर्थिक व्यवहाराचे पुरावे शक्यता जवळ ठेवा. तक्रार दाखल करताना डाक्युमेंट अपलोड करता येतील.
तक्रार दाखल केल्यानंतर तुम्ही स्टेटस तपासू शकता.