देशात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. कुटुंबासमवेत फिरायला जायचे म्हटले तर खर्च देखील खूप वाढतो. इंटरनॅशनल टुरिझमसाठी लाखोंमध्ये खर्च येतो. मात्र मागील काही वर्षात बँकांकडून कर्ज घेऊन पर्यटन करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अर्थव्यवस्था ज्याप्रकारे वाढली आहे तसेच ग्राहकांमध्ये नवनवीन ट्रेंड वाढत आहेत. ट्रॅव्हल फायनान्स घेण्यापूर्वी ग्राहकांनी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
ट्रॅव्हल फायनान्स किंवा ट्रॅव्हल लोन हे वैयक्तिक कर्जाच्या श्रेणीत मोडते. प्रत्येक बँक आणि वित्त संस्थेकडून ट्रॅव्हल लोन देताना वेगवेगळ्या घटकांचा विचार केला जातो. टुरिझमप्रमाणे बिझनेस ट्रीपसाठी देखील बँकांकडून ट्रॅव्हल लोन दिले जाते.ट्रॅव्हल लोनचा वापर हा तिकिटांपासून इतर प्रवास, स्थल दर्शन, हॉटेलमधील वास्तव्य आणि जेवणाचा खर्च यासाठी केला जाऊ शकते. ट्रॅव्हल लोनमधूल मिळालेली कर्जाची रक्कम कुठे खर्च करावी असे काही निर्बंध नाहीत. देशांतर्गत पर्यटनासाठी किंवा इंटरनॅशनल पर्यटनासाठी ही रक्कम वापरता येते.
Table of contents [Show]
व्याजदर आणि ऑफर्स तपासा
ट्रॅव्हल लोन घेताना त्यावर व्याजदर किती लागू होते याचा विचार ग्राहकाने करायला हवा. बँका आणि एनबीएफसी कंपन्या यांच्यामधील ट्रॅव्हल लोन इंटरेस्ट रेटची तुलना करणे आवश्यक आहे. याशिवाय ट्रॅव्हल लोनवर प्रोसेसिंग फि किंवा इतर छुपे शुल्क लागू केले जाते का, याचाही ग्राहकाने विचार करायला हवा. काही बँकांकडून किंवा पर्यटन कंपन्यांकडून प्री अप्रुव्ह ट्रॅव्हल लोनच्या ऑफर्स दिल्या जातात. या पर्यायाचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो. तात्काळ कर्ज मंजूर करणारे अॅपचा विचार करता येईल.
किती कर्ज मिळेल
सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्न मर्यादा आणि सिबिल स्कोअरनुसार 40 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.ट्रॅव्हल लोन जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी दिले जाते. मात्र कमीत कमी कालावधीसाठी ट्रॅव्हल लोन घेणे चांगले ठरते. यामुळे कर्जफेड लवकर होते आणि गुंतवणुकीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही.
किमान कागदपत्रे आणि झटपट प्रोसिजर
बँकांकडून दिला जाणऱ्या विविध लोन्सपैकी ट्रॅव्हल लोन ही झटपट दिले जाणारे कर्ज आहे. कर्जदाराकडून किमान कागदपत्रे घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. जसे की तुमची ओळखपत्रे, राहण्याचा पुरावा आणि उत्पन्ना पुरावा या कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर केले जाते. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा अनेक बँकांकडून उपलब्ध आहे.
क्रेडीट कार्डऐवजी चांगला पर्याय
सर्वसाधारणपणे पर्यटन करताना क्रेडीट कार्डचा सर्रास वापर केला जातो. मात्र कार्डमधून वापलेली रक्कम परतफेड करताना अनेकदा जादा व्याज द्यावे लागते. शिवाय क्रेडीट कार्डसाठी अनेक मर्यादा आहेत. जसे की प्रोसेसिंग फी, जादा व्याजदर आणि क्रेडीटची मर्यादा आहेत. याउलट ट्रॅव्हल लोन सुलभ आहे. ट्रॅव्हल लोन क्रेडीट कार्डप्रमाणेच काम करते पण त्याचा व्याजदर तुलनेने कमी आहे.