• 04 Oct, 2022 15:59

RBI MPC ची तीन दिवसीय बैठक आज पासून ; रेपो रेट वाढण्याची शक्यता

rbi repo rate

बुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास व्याजदरात वाढ किंवा कपात जाहीर करणार

देशभरातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. या महागाईमुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत महागाई कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India - RBI) चलनविषयक धोरण बैठक (RBI MPC Meeting) आज म्हणजेच सोमवारपासून सुरू झाली आहे. ही बैठक 3 दिवस चालणार आहे. बुधवारी, आरबीआय (RBI)पॉलिसी दरांमध्ये वाढ किंवा कपात जाहीर करेल. या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) व्याजदरात 40 बेसिस पॉईंटने वाढ करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

व्याजदरात 0.40 टक्क्याने वाढ होण्याची शक्यता 

आरबीआय (RBI) बैठकीत व्याजदरात आणखी 0.40 टक्के वाढ करू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, ऑगस्टच्या आढाव्यातही ते 0.35 टक्क्यांनी वाढू शकते. जर असे झाले नाही तर आरबीआय पुढील आठवड्यात 0.50 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते असा अंदाज आहे. याचा परिणाम असा होईल की कर्जाचे ईएमआय (EMI) पुन्हा एकदा महाग होऊ शकतात. जर आधीच कर्ज घेतले असेल, तर तुमचा ईएमआय (EMI) वाढेल आणि पुढे कर्ज घेण्याचा विचार करत असलात तरीही तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. कारण आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर सर्व खाजगी आणि सरकारी बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होतो.

मे महिन्यातील व्याजदरातील वाढ 

गेल्या महिन्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (Marginal propensity to consume - MPC) बैठकीत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. 4 मे रोजी झालेल्या पतधोरण बैठकीनंतर RBI ने अचानक रेपो दर 40 बेसिस पॉईंट्सने वाढवून 4.40 टक्के केला आणि कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio) 50 बेसिस पॉईंट्सने 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांवर नेला. आरबीआयने (RBI) 4 मे रोजी रेपो दरात 40 बेसिस पॉईंट वाढीची घोषणा केली, तेव्हापासून, सार्वजनिक-खाजगी बँकांपासून गृह वित्त कंपन्यांपर्यंत, गृहकर्जापासून ते इतर प्रकारची कर्जे महाग होत आहेत. त्यामुळे आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय महाग होत आहे. आणि ईएमआय महाग होण्याची प्रक्रिया इथेच थांबणार नाही. जूनमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर कर्जदारांना पुन्हा झटका बसू शकतो.

व्याजदरात वाढ झाल्याने कर्ज आणि ईएमआय (EMI) वाढणार आहेत. त्यामुळे सामान्यांना करावे तरी काय हे म्हणण्याची वेळ येणार आहे.