Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवला, कर्जदार आहात पुढे काय होणार? जाणून घ्या

Home Loan

Image Source : www.business-standard.com

RBI Monetary Policy: एप्रिल 2022 मध्ये गृह कर्जाचा सरासरी व्याजदर 6.75% इतका होता. मात्र महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली. ज्यामुळे वर्षभरात कर्जाचा दर 9.25% इतका वाढला. यामुळे फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दरवाढीचा सपाटा सुरुच होता. त्याला एप्रिल 2023 मध्ये विराम मिळाला. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षातील पहिल्याच पतधोरणात सावध पाऊल टाकत रेपो दर स्थिर ठेवला होता.

महागाई रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने कठोर पतधोरण राबवले होते. आर्थिक वर्ष 2022-23 कर्जदारांसाठी प्रचंड खर्चिक गेले. आरबीआयच्या रेपो दरवाढीपाठोपाठ बँकांनी देखील कर्जाचा दर वाढवला. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 या दरम्यान रेपो दरात 2.5% वाढ झाली होती. मात्र मागील दोन पतधोरणात रिझर्व्ह बँकेने पतधोरणात सौम्य भूमिका घेतली आहे. रेपो दर जैसे थे ठेवल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सलग दोन पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवल्याने व्याजदर वाढीचे सत्र संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ज्यांनी रेपोशी संलग्न कर्जदराशी कर्ज घेतले होते त्या कर्जदारांची दोन वर्षांत प्रचंड होरपळ झाली. विशेषत: दिर्घ मुदतीतील गृह कर्जांना फटका बसला. काहींचा ईएमआयचा भार वाढला तर काहींसाठी कर्जफेडीचा कालावधी वाढला.

आरबीआयच्या रेपो दरवाढीनंतर गृह कर्जाची परतफेज सरासरी 136% ने वाढली. 20 वर्ष मुदतीचे 40 लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्या कर्जादाराच्या परतफेडीच्या खर्चात वाढ होऊन शकते. मुदत पूर्तीवेळी त्याला 49.48 लाख फेडावे लागतील.  

एप्रिल 2022 मध्ये गृह कर्जाचा सरासरी व्याजदर 6.75% इतका होता. मात्र महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली. ज्यामुळे वर्षभरात कर्जाचा दर 9.25% इतका वाढला. यामुळे फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दरवाढीचा सपाटा सुरुच होता. त्याला एप्रिल 2023 मध्ये विराम मिळाला. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षातील पहिल्याच पतधोरणात सावध पाऊल टाकत रेपो दर स्थिर ठेवला होता.

कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय कालावधीनुसार वाढला आहे.15 वर्ष मुदतीच्या कर्जाचा ईएमआय 16% ने वाढला. 20 वर्षांसाठीच्या ईएमआयच्या रकमेत 20% वाढ झाली. 30 वर्ष मुदतीच्या कर्जांचा ईएमआय सरासरी 26.5% ने वाढला होता. जादा ईएमआयमुळे नोकरदारांना पैशांची तजवीज करावी लागली.

कर्जदारांसाठी त्रासदायक ठरणारा व्याजदर वाढीचा काळ आता सरला आहे. महागाईचे आलेख असाच कमी होत गेला तर वर्ष 2023 अखेर व्याजदर कपात शक्य असल्याचे बँकबझारचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले. काही जाणकारांच्या मते व्याजदर कपात अपेक्षेपेक्षा आधी होऊ शकते. व्याजदर स्थिर असल्याने कर्जदारांना ईएमआयचा भार कमी करण्यासाठी इतर पर्यायांचा वापर करता येऊ शकतो.

इतर बँकांकडे विचारणा करा

जर तुम्ही गृहकर्जदार आहात आणि ईएमआय भरत असाल तर EMI चा भार हलक करण्यासाठी तुमच्या समोर एक पर्याय आहे. तुम्ही रिफायनान्सिंगबाबत इतर बँकांशी संपर्क साधू शकता. तुमचे कर्ज इतर बँकेकडे हस्तांतर करु शकतात. मार्केटमध्ये स्पर्धा असल्याने बँकांकडून गृहकर्जाचा दर स्पर्धात्मक ठेवला जातो. अशा बँकेशी संपर्क साधून तुम्ही तुमच्या मागण्या समोर ठेवू शकता. गृहकर्ज दरात किमान 0.35% ते 0.50% सवलत मिळाली तरी संपूर्ण कर्जफेडीत तुमची मोठी बचत होऊ शकते.

शक्य असल्यास गृहकर्जाची परतफेड करा

कर्जाचे दर प्रचंड वाढल्याने तुमचा मासिक हप्ता देखील वाढला किंवा कर्जफेडीचा कालावधी वाढला होता. आता सलग दोन पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवला आहे. नजीकच्या काळात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता कर्जदारांना शक्य असल्यास कर्जाची निम्मी किंवा पूर्ण परतफेड करावी, असा सल्ला बँकबझारडॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी दिला. चांगला क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री असल्यास ग्राहकांना सवलतीच्या दरात कर्ज मिळू शकते. सध्या गृहकर्जाचा दर सरासरी 8.50% असून त्यावर 2% प्रीमियम लागू होतो.

आणखी सहा महिने कळ सोसावी लागेल

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दर स्थिर ठेवतानाच महागाईबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सलग दोन पतधोरणात रेपो स्थिर ठेवला म्हणजे येत्या पतधोरणात व्याजदरात कपात होईल, अशी शक्यता कमी आहे. तूर्त कर्जदारांना मागील वर्षभरात वाढलेल्या कर्जाचा फटका सहन करावा लागेल. प्रत्यक्ष व्याजदर कमी होण्यासाठी किमान सहा महिने वाट पहावी लागेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.