Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Cup 2023: आयसीसी वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळणार 33 कोटी रुपयांचं बक्षीस

ICC Men's Cricket World Cup 2023

Image Source : www.icc-cricket.com

ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतात खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयसीसीने तब्बल एक कोटी डॉ़लर्सच्या बक्षीसांची लयलूट केली आहे. विजेता संघ ३३ कोटी रुपयांचा धनी होणार आहे. मात्र साखळीतल्याही प्रत्येक विजयासाठी आयसीसी त्या संघास ४० हजार डॉलर्स म्हणजेच साधारणपणे ३३ लाख रुपये देणार आहे.

वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 आता अगदी जवळ आला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 रोजी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप भारतात रंगणार आहे. या स्पर्धेत 10 देश खेळणार आहेत. आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेतील बक्षीसांची घोषणा केली आहे. या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला आयसीसीने 33 कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.

उपविजेत्या संघाला मिळणार 16 कोटी रुपये

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतल्या उपविजेत्या संघाला 16 कोटी रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत आयसीसी एकंदरीत एक कोटी डॉलर्सचं वितरण करणार आहे. भारतीय चलनात हा आकडा 82 कोटी 95 लाख 15 हजार 488 इतका होतो.उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघास 8 कोटी डॉलर्स म्हणजेच साधारणपणे 6 कोटी रुपये मिळणार आहेत.

या बक्षीसाच्या रकमेचं वाटप कशाप्रकारे केलं जाणार आहे त्यावरही एक नजर टाकूया

                   कोणत्या टप्प्यावर कसं होणार बक्षीसाचं वाटप

विजेता संघ                                                बक्षीस डॉलर्समध्ये        एकूण डॉलर्स
विजेता (1)                                                 40,00,000                40,00,000
उपविजेता (1)                                            20,00,000                20,00,000
उपांत्य फेरीत पराभूत (2)                             8,00,000                 16,00,000
साखळीतले बाद संघ (6)                             1,00,000                   6,00,000
साखळी सामन्यातले विजयी संघ (45)             40,000                 18,00,000


पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. आयसीसीने या स्पर्धेत साखळी सामन्यातल्या प्रत्येक विजयासाठीही 40 हजार डॉलर्सची रक्कम देण्याचं ठरवलं आहे. या स्पर्धेत एकंदरीत 45 साखळी समने खेळवले जाणार आहेत. कोणता संघ ही स्पर्धा जिंकणार याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.