Madhusudan Masala: मधुसूदन मसाला कंपनीचा शेअर आज (दि. 26 सप्टेंबर) एनएसई एसएमईवर शेअर्सच्या मूळ किमतीपेक्षा 71.43 टक्क्यांनी लिस्टिंग झाला. यामुळे गुंतवणूकदारांना मधुसूदन मसालेकडून चांगलीच ट्रीट मिळाली आहे. याची प्रति शेअर किंमत 70 रुपये होती. त्यामध्ये जवळपास 70 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 120 रुपयांवर सूचिबद्ध झाला.
मधुसूदन मसाले कंपनीचा आयपीओ 18 ते 21 सप्टेंबर या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. या एसएमई आयपीओला (SME IPO) गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. एकूण सब्स्क्रिप्शनपैकी 444.27 पट अधिक त्याची मागणी होती. त्याचबरोबर किरकोळ गुंतवणूकदारांनीही यासाठी 592.73 पट मागणी केली होती. कंपनीने याची प्रति शेअर्सची किंमत 66 ते 70 रुपये अशी निश्चित केली होती. तसेच याच्या प्रत्येक शेअर्सची फेस व्हॅल्यू किंमत 10 रुपये होती. या 70 रुपयांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 120 रुपये किंमत मिळवून दिली आहे.
गुंतवणूकदारांना थेट 1 लाखाचा नफा
मधुसूदन आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 1 लाख 40 हजार रुपयांची आवश्यकता होती. पण या आयपीओने गुंतवणूकदारांच्या 1 लाख 40 हजार रुपायंचे 2 लाख 40 हजार रुपये केले. यातून गुंतवणूकदारांना 1 लाखाचा थेट नफा झाला.
मधुसूदन मसाला कंपनीच्या आयपीओ 23.80 कोटींचा होता. यासाठी कंपनीने 34 लाख नवीन इक्विटी शेअर्स उपलब्ध करून दिले होते. मधुसूदन कंपनीचे मार्केटमध्ये डबल हाथी आणि महाराजा या नावाने ब्रॅण्ड आहेत. या ब्रॅण्ड अंतर्गत कंपनी 32 हून अधिक प्रकारचे मसाले विकते. कंपनीला मार्च, 2023 पर्यंत 575.89 लाख रुपयांचा नफा झाला होता. तर कंपनीवर 42.17 कोटी रुपयांचे कर्ज आहे.