Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Loan Rate: पंजाब नॅशनल बँकेसह 'या' बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवले; EMI सुद्धा वाढणार

Bank Loan Rate

बँकांकडून कर्ज घेणं आता महाग झालं आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB Bank), बँक ऑफ इंडिया (BOI) आणि बंधन बँकेने लोनवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे आता EMI ही जास्त द्यावा लागणार आहे. बँकाकडून कोणत्याही प्रकारे कर्ज घेताना कमीत कमी जे व्याजाचे दर आकारले जातात, त्यामध्ये आता वाढ केली आहे. या दरापेक्षा कमी दराने बँक व्याजदर आकारु शकत नाही.

Bank Loan Rate: बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँक, बंधन बँक आणि बँक ऑफ इंडियाने कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे आता EMI ही जास्त द्यावा लागणार आहे. marginal cost of funds-based lending rates (MCLR) कर्जाचे व्याजदर बँकांनी वाढवले आहे. बँकाकडून कोणत्याही प्रकारे कर्ज घेताना कमीत कमी जो व्याजाचा दर आकारला जातो, त्यामध्ये बँकांनी वाढ केली आहे. यापेक्षा कमी दराने बँक व्याजदर आकारू शकत नाही.

पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर - (PNB bank Loan rate)

पंजाब नॅशनल बँकेने marginal cost of funds-based lending rates (MCLR) चे व्याजदर 10 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. बँकेचा ओव्हरनाइट बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट लेंडिग दर 7.90% वरुन 8% झाला आहे.

एक, तीन आणि सहा महिन्याच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे 8.10%, 8.20%, आणि 8.40% एवढे झाले आहे. तर एक वर्षाच्या MCLR कर्जावरील व्याजदर 8.50% झाला आहे. पूर्वी हा दर 8.40% इतका होता. तर तीन दिवसांचे व्याजदर 8.80% झाले आहेत.

बँक ऑफ इंडिया (Bank Of India Loan rate)

बँक ऑफ इंडियाने देखील marginal cost of funds based lending rates (MCLR) चे व्याजदर 10 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. बँकेचा ओव्हरनाइट बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट लेंडिग दरात बदल केला नाही. मात्र, इतर कालावधीतील कर्जासाठीचे व्याजदर वाढवले आहेत.

एक, तीन आणि सहा महिन्याच्या कर्जावरील व्याजदरात 10 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे.  अनुक्रमे 7.95%, 8%, आणि 8.25% एवढे झाले आहे. तर एक वर्षाच्या MCLR कर्जावरील व्याजदर 8.40% झाला आहे. पूर्वी हा दर 8.50% इतका होता. तर तीन वर्षांच्या कर्जावरील व्याजदर 8.70% झाले आहेत.

बंधन बँक (Bandhan Bank loan rate)

बंधन बँकेने देखील marginal cost of funds-based lending rates (MCLR) चे व्याजदर वाढवले आहेत. कालपासून म्हणजे 28 फेब्रुवारीपासून नवे दर लागू झाले आहेत. 6.71% इतका आहे. 

एक, तीन आणि सहा महिन्याच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे 6.71%, 8.21%, आणि 8.21% एवढे झाले आहे. तर एक वर्षाच्या MCLR कर्जावरील व्याजदर 10.96% झाला आहे. पूर्वी हा दर 8.50% इतका होता. तर तीन वर्षांच्या कर्जावरील व्याजदर 10.96% झाले आहेत. तीन वर्षाच्या कर्जावरही 10.96 इतका व्याजदर आकारण्यात येईल.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयकडून मागील पतधोरणामध्ये व्याजदर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे बँकाद्वारे देण्यात येणारी कर्जेही महाग झाली आहेत. गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेण्याऱ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. हप्त्यावर तुम्ही घर घेतले असले किंवा इतर कोणती खरेदी केली असेल तर तुमचा EMI चा हप्ताही आता वाढणार आहे.