Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Open Your Zero Balance Account In These Banks : 'या' बँकांमध्ये सुरु करा झिरो बॅलन्स अकाउंट

Zero Balance Account, Bank Account

Open Your Zero Balance Account In These Banks : देशातील अनेक बँका झिरो बॅलन्स अकाउंटची सेवा देत आहेत.आज आम्ही तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट म्हणजे काय? आणि कोणत्या बँका उत्तम झिरो बॅलन्स अकाउंटची सेवा पुरवतात हे सांगणार आहोत.

झिरो बॅलन्स अकाउंटच्या नावातच या खात्याचे वैशिष्ट्य लपले आहे. झिरो बॅलन्स अकाऊंट म्हणजे, असे अकाउंट ज्यामध्ये कोणतेही मिनीमम बॅलन्स ठेवावे लागत नाही. बऱ्याच बँकांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये मिनीमम 10,000 रक्कम ठेवावी लागते. पण त्यामुळे ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांना एवढे मिनीमम बॅलन्स ठेवणे कठीण जाते. देशातील अनेक बँका झिरो बॅलन्स अकाउंटची सेवा देत आहेत.आज आम्ही तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट म्हणजे काय? आणि कोणत्या बँका उत्तम झिरो बॅलन्स अकाउंटची सेवा पुरवतात हे सांगणार आहोत.

आयडीएफसी बँक (IDFC Bank) :

आयडीएफसी बँकेच्या फर्स्ट बँक फर्स्ट सेव्हिंग खाते या झीरो बॅलेन्स अकाउंटवर 6 ते 7 टक्के व्याज मिळते. या झिरो बॅलेन्स अकाउंटचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही कोणत्याही एटीएममधून कितीही व्यवहार करू शकता.

येस बँक स्मार्ट वेतन लाभ (Yes Bank Smart Salary Program)

या खात्यावर तुम्हाला 4% ते 6% पर्यंत व्याज मिळते. यासोबतच बँकेच्या एटीएमवर अमर्यादीत तर कोणत्याही इतर बँकेच्या एटीएमवर दरमहा 5 विनामूल्य व्यवहार करता येतात. त्याचप्रमाणे नेट बँकिंच्या सहाय्याने मोफत अमर्यादीत एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहार करता येतात.

इंडसइंड बँकेचं इंडस ऑनलाईन सेव्हिंग अकाउंट (IndusInd bank)

या बँकेत तुम्ही ऑनलाईन अर्ज करून झिरो बॅलन्स अकाउंट उघडू शकता. या खात्यावर तुम्हाला 4% ते 6% पर्यंत व्याज मिळते. यासह या खात्यावर तुम्हाला मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगची मोफत सुविधा मिळते.

डीबीएस डीजी सेव्हिंग्स (DBS DG savings)

या खात्यावर खातेधारकाला 5 % व्याज मिळते. या खात्यात व्हिसा पेमेंट्स वापरून कॅशलेस, कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येते. त्याचप्रमाणे यूपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएसचा 24*7 वापर करता येतो.

कोटक महिंद्राचे झिरो बॅलन्स अकाउंट खाते (Kotak Mahindra)

डिजिटल बँकिंगचा वापर करून हे अकाउंट उघडता येते. या खात्यावर खातेधारकाला 4 % व्याज मिळते.  हे खातेसुद्धा झिरो अकाऊंट खाते आहे. या खात्यात ग्राहकाला 811 व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं ज्याआधारे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता.