Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI New Rules: SBI मध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांसाठी 30 जूनपासून लागू होणार नवे नियम

SBI New Rules

SBI New Rules: स्टेट बँक ऑफ इंडीया 30 जूनपासून बँक लॉकर बाबतचे नियम बदलणार आहे. बँकेने एक नोट जारी करुन लॉकर असणाऱ्या ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत रिवाइज्ड लॉकर एग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्याची अपील केली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार बँकेने लॉकर सेवा परत सुरु केल्यानंतर काही नियमांमध्ये बदल केले होते.

एसबीआय (State Bank Of India) मध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही देशातील सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर 30 जून 2023 ही तुमच्यासाठी महत्वाची तारीख आहे. 30 जूनपासून बँक महत्वाच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. महत्वाचे म्हणजे या नियमाचा फटका देशातील कोट्यवधी ग्राहकांना बसणार आहे. ‘एसबीआय’ने आपल्या ट्विटवर यासंदर्भात माहिती दिली.

'बँक ऑफ बडोदा'ने दिला सल्ला

30 जूनपासून बँक लॉकर्सच्या नियमात बदल करणार आहे. बँकेने एक निवेदन जारी करीत, बँकेत लॉकर असलेल्या ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेकडून याबाबत सातत्याने सल्ला दिला जातो आहे. एसबीआय व्यतिरिक्त बँक ऑफ बडोदा देखील ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत सुधारित लॉकर करारांवर स्वाक्षरी करण्यास सांगत आहे.

'एसबीआय'चे आवाहन

एसबीआयने ग्राहकांना लॉकर करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले आहे. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले की, सुधारित कराराच्या सेटलमेंटसाठी कृपया तुमच्या शाखेला भेट द्या. तुम्ही याआधी देखील करारावर स्वाक्षरी केली असेल, तरीही तुम्हाला परत या करारावर स्वाक्षरी करणे अत्यंत गरजेचे आहे.

'RBI'चे आवाहन

भारतीय रिझर्व्ह बँकेनेही (RBI) ग्राहकांना आवाहन केले आहे की, 23 जानेवारी 2023 रोजी ग्राहकांना लक्षात घेऊन एक परिपत्रक जारी केले आहे.  या परिपत्रकानुसार सर्व बँकांना लॉकरशी संबंधित नियम आणि करारांची माहिती द्यावी लागेल. यासोबतच ५० टक्के ग्राहक करार ३० जूनपर्यंत आणि ७५ टक्के ३० सप्टेंबरपर्यंत रिवाइज करावे लागतील, याचीही खात्री करावी लागेल.

ग्राहकांना मिळेल भरपाई

आग, चोरी, घरफोडी, दरोडा, बँकेचा निष्काळजीपणा किंवा कर्मचाऱ्यांच्या हातून कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास बँक त्याची भरपाई करेल. ही भरपाई लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट असेल.