Banking Locker Fees: देशातील अनेक बँका त्यांच्या अनेक मोठ्या शाखांमध्ये त्यांच्या ग्राहकांना लॉकर सुविधा उपलब्ध करून देतात. लॉकरची फी आकार आणि स्थानानुसार आकारली जाते. याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कॅनडा बँक (Canada Bank) यासारख्या काही बँका, लॉकर भाड्याने घेणाऱ्याला तीन वर्षांचे भाडे आणि महिन्याचे भाडे न भरल्यास लॉकर उघडण्यासाठी लागणाऱ्या चार्जचा समावेश करुन भाडे आकारतात. सेफ डिपॉझिट लॉकर हे भाड्याने दिलेले लॉकर आहे जे बँक तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी देते.
Table of contents [Show]
बँक लॉकर काय आहे?
सेफ डिपॉझिट लॉकर हे भाड्याने दिलेले लॉकर आहे, जे बँक तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी देते. यामध्ये मौल्यवान दागिने, रत्ने, आर्थिक किंवा कायदेशीर कागदपत्रे, विमा पॉलिसी, ओळख पुरावे, इतर गोपनीय आणि वैयक्तिक वस्तू ठेवल्या जाऊ शकतात. लॉकर भाड्याने घेणाऱ्याने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी त्याच्या भाड्याचे आगाऊ पैसे (Money In Advance) भरले पाहिजेत. एचडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कॅनडा बँक, येस बँक या किती लॉकर शुल्क आकारतात हे आज आपण जाणून घेऊया.
HDFC बँक लॉकर शुल्क
एचडीएफसी लॉकर फि ही बँकेतील उपलब्धता आणि स्थानांवर अवलंबून असते. ही लॉकर फी 1350 रुपये ते 20,000 रुपये प्रतिवर्ष असू शकते. मेट्रो आणि शहरी ठिकाणी HDFC बँक सहसा मध्यम लॉकरसाठी 3,000 रुपये, मोठ्या लॉकरसाठी 7,000 रुपये आणि अतिरिक्त मोठ्या लॉकरसाठी 15,000 रुपये वार्षिक स्टोरेज शुल्क आकारते.
SBI बँक लॉकर शुल्क
एसबीआय बँक लहान आकाराच्या लॉकरसाठी शहरी आणि मेट्रो ग्राहकांसाठी 1500 रुपये + GST आणि ग्रामीण आणि लहान शहरातील ग्राहकांसाठी लहान आकाराच्या लॉकरसाठी 1000 रुपये + GST आकारेल. मध्यम आकाराच्या लॉकर्ससाठी, SBI शहरी आणि मेट्रो ग्राहकांसाठी 3000 रुपये + GST आणि ग्रामीण, निमशहरी ग्राहकांसाठी 2000 रुपये + GST शुल्क आकारते.
YES बँक लॉकर शुल्क
येस बँक वेगवेगळ्या आकाराच्या लॉकरसाठी 4,500 ते 32,000 रुपये शुल्क आकारते. येस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, लॉकर लीज कालावधी संपण्यापूर्वी सरेंडर केल्यास, जमा केलेल्या आगाऊ भाड्याच्या प्रमाणात रक्कम परत केली जाईल.
ICICI बँक लॉकर शुल्क
ICICI बँक लहान आकाराच्या लॉकरसाठी 1,200 ते 5,000 रुपये शुल्क आकारते. मध्यम आकाराच्या लॉकरसाठी बँक 2,500 ते 9,000 रुपये शुल्क आकारते. तसेच मोठ्या लॉकरसाठी 4,000 - 15,000 रुपयांदरम्यान शुल्क आकारते.
Canara बँक लॉकर शुल्क
कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी, एकवेळ लॉकर नोंदणी शुल्क ४०० रुपये अधिक जीएसटी आहे.