Bank Locker Rules: नवीन वर्ष 2023 सुरू झाल्यापासून प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. बँकिंग क्षेत्रात (banking sector) सुद्धा अनेक बदल घडून आले. बँकेकडून लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी महागाईचा बोजा वाढला आहे. असाच नियम बँक लॉकरशीही संबंधित आहे. जाणून घेऊया लॉकरशी संबंधित काय कोणते नवीन नियम लागु करण्यात आले आहे.
काय आहेत नवीन नियम.. (What are the new rules..)
जर तुम्ही बँक लॉकर (Bank Locker) भाड्याने घेतले असेल किंवा बँक लॉकर वापरण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला बँक लॉकरच्या या नवीन नियमाची माहिती असणे आवश्यक आहे. आरबीआयने 8 ऑगस्ट 2022 रोजीच याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार ग्राहकांच्या कोणत्याही वस्तूचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँकांची असेल. यासोबतच ग्राहकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँक लॉकर करारावर स्वाक्षरी (Signature) करावी लागणार आहे. यासोबतच लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती ग्राहकांना एसएमएस आणि इतर माध्यमातून द्यावी लागणार आहे.
नवीन नियमानुसार.. (According to the new rules..)
नवीन नियमानुसार, जर काही नुकसान झाले तर ही जबाबदारी थेट बँकेची असेल आणि त्यांना नुकसान भरपाई (compensation for damages) द्यावी लागेल. बँक कर्मचाऱ्याच्या फसवणुकीमुळे नुकसान झाल्यास लॉकरच्या 100 पट भाडे बँकेला भरावे लागेल. लॉकर नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) हॅक झाल्यास, बँक नुकसान भरपाईसाठी जबाबदार राहणार नाही. जर काही कारणाने लॉकरची सुविधा घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नवीन करारानुसार लॉकरची सुविधा नॉमिनीला दिली जाईल. जर त्याला हे लॉकर पुढे ठेवायचे असेल तर त्याला बँकेशी संपर्क साधावा लागेल आणि जर तो काढायचा असेल तर तो दावेदार असेल.