Sai Silk Kalamandir IPO: साई सिल्क कलामंदिर कंपनीचा आयपीओ आजपासून (दि. 20 सप्टेंबर) खुला झाला असून, कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 1201 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यापैकी 360.30 कोटी रुपयांचा निधी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून जमा केला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
साई सिल्क कलामंदिर कंपनीने प्रति शेअर्सची किंमत 210 ते 222 रुपये अशी निश्चित केली. याच्या एका लॉटमध्ये जवळपास 67 शेअर्स आहेत. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण शेअर्सपैकी निम्मे शेअर्स हे पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyers-QIB) यांच्यासाठी तर 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदार (Non-Institutinal Investors-NII) आणि 35 टक्के भाग हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. शेअर्सचे वाटप 27 सप्टेंबर रोजी केले जाणार असून 4 ऑक्टोबरला त्याचे बीएसई आणि एनएसई (BSE & NSE) लिस्टिंग होणार आहे.
Table of contents [Show]
गुंतवणुकीपूर्वी या 8 गोष्टी समजून घ्या
आयपीओची तारीख
साई सिल्क कलामंदिरचा आयपीओ आजपासून (दि. 20 सप्टेंबर) ओपन झाला असून तो 22 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
शेअर्सची किंमत
कंपनीने शेअर्सची किंमत 210 ते 220 अशी निश्चित केली आहे.
आयपीओचा व्हॉल्यूम
साई सिल्क कलामंदिर कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1201 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून यापूर्वीच 360 कोटी रुपये जमा केले आहेत. या आयपीओमध्ये एचएसबीसी, बीएनपी पारिबास आर्बिट्राज, एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्टशिअल म्युच्युअल फंड, व्हाईटओक कॅपिटल, एचडीएफसी म्युच्युअल फंड, कोटक महिन्द्रा ट्रस्टी, आदित्या बिर्ला सन लाईफ ट्रस्टी, मिराई अॅसेट इंडिया आदी कंपन्यांनी यामध्ये गुंतवणूक केली.
आयपीओचा उद्देश
कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून 30 नवीन स्टोअर्स सुरू करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनीने 125.08 कोटी रुपयांचा प्लॅन तयार केला आहे. तसेच गोदामांसाठी 25.4 कोटी इतर गोष्टींसाठी 280.07 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. याचबरोबर कंपनी यातून 50 कोटी रुपयांचे कर्जसुद्धा फेडणार आहे.
लॉट साईज
साई सिल्क आयपीओच्या एका लॉटमध्ये 67 शेअर्स आहेत. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असल्यास त्यासाठी अंदाजे 15 हजार रुपये गुंतवावे लागतील.
साई सिल्क कंपनीबाबत
साई सिल्क कलामंदिरची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये 54 स्टोअर्स आहेत. नागकनका दुर्गा प्रसाद चलावडी यांनी साई सिल्क कलामंदिरची स्थापना केली. कंपनी पारंपरिक आणि महागड्या अशा सिल्कच्या साड्या, तसेच पुरुषांचे आणि मुलांचे पारंपरिक कपड्यांची विक्री करते.
कंपनीची आर्थिक स्थिती
कंपनीची मागील वर्षात आर्थिक स्थिती खूपच चांगली होती. यातून कंपनीला जवळपास 69.1 टक्के (97.6 कोटी) नफा झाला होता. यावर्षी आणखी नफा होण्याची चिन्हे आहेत.
लिस्टिंग तारीख
साई सिल्क कलामंदिरच्या शेअर्सचे लिस्टिंग एनएसई आणि बीएसई दोन्हीवर होणार आहे. कंपनीने लिस्टिंगबाबात अजून अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण अंदाजे 4 ऑक्टोबर, 2023 रोजी लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.