Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kalyan Jewellers: कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यात वाढ, शेअरमधील तेजीने गुंतवणूकदार मालमाल

kalyan jewellers

Image Source : www.justdial.com

Kalyan Jewellers: कल्याण ज्वेलर्स आघाडीच्या ज्वेलर्सपैकी एक आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. ही घोषणा सर्वच ज्वेलर्सच्या पथ्यावर पडली आहे.

सराफा उद्योगातील आघाडीची कंपनी कल्याण ज्वेलर्सला 30 जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 144 कोटींचा नफा झाला आहे. पहिल्या तिमाहीत नफ्यात 33% वाढ झाली. रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोटबंदी केल्यानंतर ज्वेलरीच्या विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. ( (Kalyan Jewellers post 144 crore profit in First Quarter)

सोन्याचा भाव मागील सहा महिन्यांपासून तेजीत आहे. यामुळे एप्रिल महिन्यात अक्षय तृतीयेला सोने विक्रीत वाढ झाली होती. कल्याण ज्वेलर्स आघाडीच्या ज्वेलर्सपैकी एक आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. ही घोषणा सर्वच ज्वेलर्सच्या पथ्यावर पडली आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट चलनात वैध आहे. ग्राहकांनी सोन्याचे दागिने, चोख सोने खरेदीसाठी 2000 रुपयांची नोट वापरल्याचे दिसून आले आहे.

कल्याण ज्वेलर्सच्या महसुलात 31.3% वाढ झाली आहे. कल्याण ज्वेलर्सला एप्रिल ते जून या तिमाहीत 4 हजार 376 कोटींचा एकूण महसूल मिळाला. भारतातील एकूण महसुलात 34% वाढ झाली.

पहिल्या तिमाहीत केवळ भारतातीलच नव्हे तर कंपनीच्या मध्य पूर्वेकडील शोरुम्समधून सोने, दागिने यांची चांगली विक्री झाल्याचे कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणारमण यांनी सांगितले. याच महिन्यात कल्याण ज्वेलर्सने जगभरातील बाजारपेठेतले 200 वे दालन सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.

कल्याण ज्वेलर्सने उत्तर भारतातदेखील विस्तार केला आहे. आज डेहराडून येथे कंपनीच्या दुसऱ्या शोरुमचे अनावरण करण्यात आले. उत्तराखंडमधील नव्या गुंतवणुकीमुळे कल्याण ज्वेलर्सला उत्तर भारतातील सराफा बाजारपेठेत आपली दावेदारी भक्कम करता येईल, असा विश्वास रमेश कल्याणारमण यांनी व्यक्त केला.

kalyan-jewellers-india-ltd-live-on-bse.png

कल्याण ज्वेलर्सच्या 200 व्या शोरुमनिमित्त ऑफर्स (Kalyan Jewellers Offers)

यानिमित्ताने कल्याण ज्वेलर्सने ग्राहकांसाठी लकी ड्रॉ आयोजित केला आहे. कल्याण ज्वेलर्समधूल प्रत्येक खरेदीवर एक कूपन देण्यात येणार आहे.  सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 25% सवलत देण्यात आली आहे. तयार दागिन्यांमध्ये रत्न आणि खड्यांच्या मूल्यावर 25% सवलत आहे. याशिवाय 200 लकी ग्राहकांना 2 ग्रॅमचा गोल्ड कॉईन बक्षीस दिला जाणार आहे.

कल्याण ज्वेलर्सचा शेअर वधारला (Kalyan Jewellers Share Rise)

कल्याण ज्वेलर्सने पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी केल्याचे पडसाद शेअरवर उमटले. गेल्या आठवड्याच कल्याण ज्वेलर्सचा शेअर तेजीत होता. आज गुरुवारी 17 ऑगस्ट 2023 रोजी कल्याण ज्वेलर्सचा शेअर 222.70 रुपयांवर बंद झाला. मागील सहा महिन्यात कल्याण ज्वेलर्सचा शेअर 45% ने वाढला आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 228.50 रुपये इतका आहे. आता तो 52 आठवड्यातील उच्चांकी पातळी समीप आहे. कंपनीचे बाजार भांडवल 22 हजार 940 कोटी इतके आहे. 
-------------