जोन्जुआ ओव्हरसीजच्या संचालक मंडळाने 9:50 च्या प्रमाणामध्ये अतिरिक्त बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. म्हणजेच ही कंपनी प्रत्येक 50 शेअर्समागे 9 शेअर्स देणार आहे. 8 सप्टेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर कंपनीच्या शेअर्सची किंमत 13.27 रुपयांवर बंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी या कंपनीच्या शेयर्सने चांगलीच उडी मारली 13.27 रुपयांवरून जोन्जुआ ओव्हरसीजचा शेयर 15 सप्टेंबर रोजी 14.19 रुपयांवर येऊन थांबला. आता या शेअर ची दिशा पुढे कशी असेल हे सोमवारी कळेल.
3 वर्षांत चार वेळा बोनस शेअर
बोनस देण्याच्या बाबतीत "जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेडचा" या कंपनीचा रेकॉर्ड फार जबरदस्त राहिलेला आहे. कंपनी गेल्या 3 वर्षांमध्ये चौथ्यांदा बोनस देत आहे. याआधी कंपनीने जुलै 2020 मध्ये 1:43 च्या प्रमाणामध्ये बोनस शेअर्स दिले होते. त्यानंतर कंपनीने जुलै 2021 मध्ये 5:37 असे बोनस शेअर्स दिले होते. यानंतर, ऑक्टोबर 2022ला, कंपनीने 4:23 या प्रमाणामध्ये बोनस शेअर्स जारी केले होते. यावेळेस कंपनी 9:50 च्या प्रमाणामध्ये बोनस शेअर्स देत आहे.
वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 33 टक्क्यांनी वाढ
कंपनीच्या स्टॉकमध्ये या वर्षी आतापर्यंत 33 टक्क्यांची वाढ झालेली असून ही वाढ फक्त गेल्या एका महिन्यात झालेली आहे. कंपनीचे शेअर्स 10 ऑगस्ट 2023 ला BSE वर 11 रुपयांवर होते, नंतर ते 8 सप्टेंबर 2023 रोजी 13.27 रुपयांवर पोहोचले. या कंपनीचा शेअर्स मागील 52 आठवड्यात 17.49 रुपयांच्या उच्चांकपर्यंत पोहोचला होता. तर त्याची नीचांकी पातळी ही 8.04 रुपये इतकी नोंदवली गेली आहे.
कंपनीच्या शेअर्सचा 15 सप्टेंबर 2023 चा तपशील
Trade Value (लाखांमध्ये) - 4.97
Dividend Yield (%) - 0.00
TTM EPS - 1.75
P/E Ratio - 8.10
Book Value - 19.14
Face Value - 10
Market Cap (in Mn) - 95.31
Price/Earning (TTM) - 6.89
Price/Sales (TTM) - 2.64
Price/Book (MRQ) - 0.74
PAT Margin (%) - 33.64
ROCE (%) - 9.91