Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in IPO: झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडचा 392 कोटींचा IPO, जाणून घ्या डिटेल्स

IPO

Investment in IPO:झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस ही बिझनेस टू कस्टमर या क्षेत्रात सेवा पुरवठादार कंपनी आहे. वर्ष 2011 पासून कंपनीकडून खर्चाचे व्यवस्थापन आणि मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी सेवा पुरवल्या जातात. झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस प्रीपेड कार्ड्स इश्यू करते.

फिनटेक सेवा क्षेत्रातील झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडने भांडवली बाजारातून निधी उभारणीची घोषणा केली आहे. कंपनीचा 392 कोटींचा आयपीओ 14 सप्टेंबर 2023 रोजी खुला होणार आहे. यामध्ये प्रती शेअर 156 ते 164 रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 90 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. अर्थात गुंतवणूकदारांना किमान 14760 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर 2023 पर्यंत खुला आहे. कंपनीने शेअर्स विक्रीतून मिळणारे भांडवल व्यावसायिक विस्तारासाठी वापरण्याचे ठरवले आहे. समभाग विक्री योजनेच्या माहितीपुस्तकानुसार आयपीओत कंपनी 10449816 शेअरची विक्री करणार आहे. यातून 392 कोटींचे भांडवल उपलब्ध होईल. यापूर्वी कंपनीने ऑगस्ट महिन्यात बड्या गुंतवणूकदारांकडून 98 कोटी उभारले होते.  

गुंतवणूकदारांना किमान 90 शेअर्ससाठी अर्ज करता येईल. या इश्यूमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10% शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेसचा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे.

नव्या कंपन्यांचे अधिग्रहण करणे तसेच नवे तंत्रज्ञानासह उत्पादन विकसित करण्यासाठी आयपीओतील भांडवल वापरले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीवर 17 कोटींचे कर्ज आहे. त्याची परतफेड केली जाणार आहे.

झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस ही बिझनेस टू कस्टमर या क्षेत्रात सेवा पुरवठादार कंपनी आहे. वर्ष 2011 पासून कंपनीकडून खर्चाचे व्यवस्थापन आणि मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी सेवा पुरवल्या जातात. झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस प्रीपेड कार्ड्स इश्यू करते. कंपनीला आर्थिक वर्ष 2023 मध्ये 553 कोटींचा महसूल मिळाला होता. त्यात 23 कोटींचा नफा मिळाला होता.

झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेसचा असा असेल IPO प्रोग्रॅम

  • IPO खुला होणार : 14 ते 18 सप्टेंबर
  • शेअर वाटप : 22 सप्टेंबर
  • शेअर डिमॅट खात्यात जमा होणार : 26 सप्टेंबर
  • शेअरची लिस्टींग : 27 सप्टेंबर

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)