Best Coffee Franchises: भारतात चहाला जेवढी मागणी आहे; तेवढीच कॉफीला सुद्धा आहेत. तुम्हाला वाटेल भारतात बाहेरून कॉफी एक्सपोर्ट केली जात असेल. पण तसे नाहीये. उलट जगभरात ज्या देशांच्या कॉफीला सर्वाधिक मागणी आहे. त्या यादीत भारताची कॉफी पहिल्या 10 देशांमध्ये आहे.
भारताची एकूण लोकसंख्या पाहता त्यातील जवळपास 68 टक्के लोक आवडीने कॉफी पितात. तर जगभरात भारत हा सहावा देश आहे. जो सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतो. यावरून भारतातील कॉफीचे उत्पादन आणि डंका तुमच्या लक्षात आला असेल. तर कॉफी लव्हर्समुळे भारतातील कॉफी हाऊस आणि कॉफी फ्रांचाईसीला मोठी मागणी आहे. हे कॉफी हाऊस आता कॉर्पोरेटमधील मोठे हब बनले आहे. इथे फक्त कॉफी प्यायली जात नाही. तर कॉफीसोबत मिटिंग्स होतात. मोठमोठ्या डील ठरतात. त्यामुळे भारतात अशा कॉफी फ्रांचाईसीची डिमांड आहे.
आज आपण भारतातील अशाच काही प्रसिद्ध आणि निवडक कॉफी फ्रांचाईसींबद्दल जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
बॅरिस्ता कॉफी चैन ही एसप्रेसो बार अॅण्ड कॅफे (Espresso Bars & Cafe)द्वारे चालवली जाते. बॅरिस्तामध्ये हॉट आणि कोल्ड अशी दोन्ही फॉर्ममध्ये इटालिअन कॉफी दिली जाते. बॅरिस्ताचे मुख्य ऑफिस नवी दिल्ली येथे असून, त्याची संपूर्ण भारतभरात 350 हून अधिक आऊटलेट्स आहेत. वर्ष 2000 मध्ये सुरू झालेला भारतीय ब्रॅण्ड 23 वर्षांना आता एका वेगळ्या फेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. 2024 पर्यंत भारतात याची 500 आऊटलेट्स उभारण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. बॅरिस्ता हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे कॅफे चैन आहे. याच्या फ्रांचाईसीसाठी 40 ते 50 लाख रुपये खर्च येतो.
सीसीडी (Cafe Coffee Day)
सीसीडी तरुणाचे सर्वांत आवडीचे ठिकाण. कारण निव्वळ एका कॉफीच्या खरेदीवर इथे कितीही वेळ गप्पा मारत बसता येते. याची सुरुवात बंगळुरुमध्ये 1996 मध्ये झाली होती. फेब्रुवारी, 2023 मधील आकडेवारीनुसार सीसीडीची भारतभरात जवळपास 1,384 आऊटलेट्स आहेत. सीसीडीच्या फ्रांचाईसीसाठी 10 ते 12 लाख खर्च येतो.
नेसकॅफे कॉफी शॉप (Nescafe Coffee Shop)
जगभरात नेस्लेची विविध उत्पादने खरेदी केली जातात. नेस्लेने आपले पहिले कॉफी शॉप 1 एप्रिल, 1938 मध्ये स्वित्झर्लंण्ड येथे सुरू केले होते. पण त्यापूर्वीपासून म्हणजे 1929 पासून नेस्ले कॉफी शॉपमध्ये उतरला होता. नेसकॅफे कॉफी शॉपची फ्रांचाईसी घेण्यासाठी 25 ते 50 लाख रुपये खर्च येतो. नेस कॅफे हा जगातील लिडिंग कॉफी ब्रॅण्ड मानला जातो. याची एकूण 180 देशांमध्ये कॉफी शॉप्स आहेत.
स्टारबक्स (Starbucks)
स्टारबक्स हा एक अमेरिकन कॉफी कंपनीचा ब्रॅण्ड आहे. याची सुरूवात वॉशिंग्टनमध्ये 1971 मध्ये झाली होती. मागील वर्षापर्यंत स्टारबक्सची 80 देशांमध्ये एकूण 35 हजारांहून अधिक आऊटलेट्स होती. त्यातील 326 आऊटलेट्स भारतात आहेत. स्टारबक्सच्या फ्रांचाईसीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते.
रिताझा (Ritazza)
रिताझा हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉफी चैन शॉप आहे. याची मालकी एसएसपी ग्रुपमधील ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनीकडे आहे. यांची हॅण्ड क्राफ्टेड कॉफी खूप प्रसिद्ध आहे. या कॉफी ब्रॅण्डची सुरूवात 1961 मध्ये झाली होती. याची जगभरात 100 ते 120 यादरम्यान आऊटलेट्स आहेत. याच्या फ्रांचाईसीसाठी किमान 1 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो.