Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upskilling: स्किल अपग्रेडिंगसाठी भारतीयांची लाखो रुपयांची गुंतवणूक; स्पर्धेत टिकण्यासाठी लढत

Upskilling

Upskilling: एका सर्व्हेक्षणातून आलेल्या माहितीनुसार जगभरात भारतीय कौशल्य विकासासाठी सर्वाधिक पैसे खर्च करत आहेत. कौशल्य विकासाचा आटापिटा हा शिक्षणाबरोबरच नोकरी टिकवण्यासाठी असल्याचेही यातून समोर आले आहे.

Upskilling: मार्केटमधील मागणीनुसार स्वत:ला अपटेड ठेवण्यासाठी भारतीय दरवर्षी 2 लाख रुपये खर्च करत आहेत. स्वत:ला अपडेट ठेवणे यामध्ये भारतीय शिक्षणाला आणि इंडस्ट्रीमध्ये सध्या जो ट्रेण्ड सुरू आहे. त्याला पूरक असे शिक्षण आणि कौशल्य आत्मसाद करण्यासाठी भारतीय दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असल्याचे एका सर्व्हेक्षण अहवालातून दिसून आले आहे.  

देशभरातील वेगवेगळ्या सेक्टरमधील, क्षेत्रातील आणि प्रोफेशनल व्यक्तींच्या सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. प्रत्येक दोन व्यक्तींमधील एक व्यक्ती ही एकतर स्वत:साठी, मुलांसाठी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी, कौशल्य विकासासाठी पैसे खर्च करत आहे.

प्रोफेशनल एज्युकेशन एमिरिट्स फर्मच्या Emeritus Global Workplace Skill Study 2023 च्या सर्व्हेमधून, भारतीय शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देतात, असे दिसून येते. त्याचबरोबर या सर्व्हेमध्ये असेही दिसून आले आहे की, नोकरी गेल्यावर किंवा पगारामध्ये कपात झाली तरी सर्वाधिक पैसे हे आरोग्यसेवा, औषधे, घरातील किराणा सामान आदी गोष्टींवर खर्च होतात. पण याचबरोबर Upskilling साठी भारतीय लोक आठवड्यातील किमान 10 ते 12 तास शिक्षणासाठी देत आहेत आणि जे प्रोफेशनल आहेत; ते वर्षभरातील किमान 3-4 महिने Upskilling Programme वर खर्च करत आहेत.

या सर्व्हेमधून हेसुद्धा दिसून आले आहे की, करिअर प्लॅन, ईंटर्नशीप, नेटवर्कींग आणि करिअर वर्कशॉपला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. यासाठी ते पैसे खर्च करण्यासाठी तयार आहेत. सर्व्हेमधील 10 पैकी 7 जण वरीलपैकी एका प्रोग्रॅममध्ये बिझी असतो. यावरून असे दिसते की, प्रत्येकजण शर्यतीमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन कौशल्ये शिकण्याच्या मागे लागला आहे आणि त्यासाठी तो सर्वाधिक पैसे खर्च करत आहे.

प्रोफेशनल एज्युकेशन एमिरिट्स फर्मने 18 वेगवेगळ्या देशातील जवळपास 6,600 प्रोफेशनल व्यक्तींचा सर्व्हे केला होता. यामध्ये  21 ते 65 वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, फ्रान्स, अमेरिका, चीन, इंग्लंड, मेक्सिको, युएई आणि काही इतर देशातील व्यक्ती होत्या. या एकूण सर्व्हेमध्ये भारतीयांची संख्या 1720 इतकी होती. यासाठी एकूण 20 शहरातील व्यक्तींची निवड करण्यात आली होती.