Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IdeaForge Allotment Status: आयडियाफोर्ज करणार शेअर वाटप, जाणून घ्या कसा चेक करायचा अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

IPO

IdeaForge Allotment Status: आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आयडिया फोर्जचा आयपीओ सरासरी 106.06 पटीने सबस्क्राईब झाला आहे. त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये आयडिया फोर्जच्या शेअरचा प्रीमियम वाढला आहे.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीकडून बुधवारी 5 जुलै 2023 रोजी शेअरचे वाटप करण्याची शक्यता आहे. आयपीओमध्ये अर्ज करणाऱ्यांना डिमॅट खात्यात शेअर प्राप्त झालेत की नाही हे कसे तपासायचे हे आपण जाणून घेणार आहोत.  

आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आयडिया फोर्जचा आयपीओ सरासरी 106.06 पटीने सबस्क्राईब झाला आहे.  त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये आयडिया फोर्जच्या शेअरचा प्रीमियम वाढला आहे.

आयडियाफोर्ज समभाग विक्रीतून 567 कोटी उभारणार आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 638 ते 672 रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जच्या शेअर तेजीत आहे. आयडियाफोर्जचा शेअर आज सोमवारी 3 जुलै 2023 रोजी ग्रे मार्केटमध्ये 510  रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे. 4 जुलै 2023 रोजी शेअरचे वाटप होण्याची शक्यता आहे.

येत्या 10 जुलै 2023 रोजी आयडियाफोर्जचा शेअर शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्याची शक्यता आहे. आयडियाफोर्जचा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार आहे. लिंकइनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयडियाफोर्जच्या आयपीओचे व्यवस्थापन करत आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी आणि नागरी वापरासाठी ड्रोन उत्पादन आणि ड्रोन तंत्रज्ञान विकसित करणारी आयडिया फोर्ज ही मुंबईतील कंपनी आहे. एका अहवालानुसार ड्रोन उत्पादनातील ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यामुळे ड्रोन उद्योगात कंपनीला विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची कंपनीत गुंतवणूक

आयडिया फोर्जमध्ये अनेक बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. डिसेंबर 2022 मधील जाहीर करण्यात आलेल्या ड्रोन उद्योगाविषयीच्या अहवालानुसार आयडिया फोर्जमध्ये इन्फोसिस, क्वालकॉम, सेलेस्टा, फ्लोरेनट्री, एक्झिम बँक, इंडसेज टेक्नॉलॉजी अशा कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.  

अशा चेक करा अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

आयडिया फोर्जचे शेअर अ‍ॅलॉटमेंट स्टेटस गुंतवणूकदारांना दोन वेबसाईटवर तपासता येणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या वेबसाईटवर या आयपीओची माहिती मिळेल. आयडिया फोर्जच्या आयपीओचे व्यवस्थापन इंकटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून केले जाते. या कंपनीच्या वेबपोर्टलवर देखील गुंतवणूकदारांना अ‍ॅलॉटमेंट स्टेटस तपासता येणार आहे.

बीएसई वेबसाईटमधून चेक करा स्टेटस

- बीएसईच्या वेबसाईटवर जा.  
- इश्यूचा प्रकार निवडा. त्यात इक्विटीची निवड करा. 
- या पर्यायात आयडिया फोर्ज या आयपीओची निवड करा. 
- पॅनकार्डचा तपशील सादर करा. 
- I am not Robot वर क्लिक करा. 
- तुम्हाला अ‍ॅलॉटमेंट स्टेटसचा तपशील दिसेल.

Intime India Private Limited वेबसाईटच्या माध्यमातून  

- Intime India Private Limited च्या वेबसाईटला भेट द्या. 
- आयपीओची निवड करा. 
- अ‍ॅप्लिकेशन नंबर, डिमॅट अकाउंट नंबर किंवा पॅनकार्ड अशा तिघांपैकी एकाचा तपशील सादर करावा लागेल. 
- तुमचे अ‍ॅप्लिकेशन कोणत्या प्रकारातील आहे त्याची निवड करा. 
- कॅप्चाची निवड करा. 
- सबमिट केल्यावर तुम्हाला अॅलॉटमेंट स्टेटस कळेल.