UPI वरुन व्यवहार करताना, सतर्क राहून व्यवहार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करण्याआधी आपण कोणाला पाठवत आहो, हे तपासणे गरजेचे आहे. तसेच, बऱ्यापैकी सर्वजण या गोष्टींचे अनुसरण करतात. मात्र, जे नवीन युझर्स आहेत त्यांनाच अशा प्रकारच्या स्कॅमचा फटका बसतो. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना जास्त टार्गेट करण्यात येते. त्यामुळे QR कोड स्कॅमपासून बचाव करायचा असल्यास, तो काय आहे हे आपल्याला पहिले समजून घेणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
क्यूआर कोडवरुन फसवणूक कशी होते?
स्कॅमर्स फसवणूक करण्यासाठी प्रत्येकवेळी वेगवेगळे प्लॅन करत असतात. यावेळी त्यांनी QR कोड निवडला आहे. यासाठी ते संबंधित व्यक्तीला QR कोड पाठवतात. तसेच, QR कोड स्कॅन केल्यावर त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतील असे त्यांना सांगितले जाते. आता पैसा कोणाला नको आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला QR कोड स्कॅन करुन त्यांना हवी असलेली रक्कम टाकायला लावतात. तसेच, त्यांच नंबरवर मिळणारा ओटीपी ही टाकण्यासाठी सांगितले जाते. ज्यावेळी ओटीपी टाकण्यात येतो, तेव्हाच पैसे त्यांच्या खात्यातून कट होतात. त्यामुळे संबंधितांना पैसे कटल्यावर कळते की त्यांची फसवणूक झाली आहे. पण, वेळ निघून गेली असते. त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी न पडता पूर्ण तपासणी करुन, पुढचे पाऊल उचलणे योग्य आहे.
QR कोडच्या फसवणुकीपासून बचाव कसा करायचा?
शक्यतो कॅश व्यवहारच करा
तुम्ही OLX सारख्या अॅपवरून काही वस्तू खरेदी करत असल्यास, शक्यतो कॅश व्यवहार करण्यासाठी विचारणा करा. कारण, रक्कम मोठी असली तर फसवणुकीची शक्यता जास्त राहते. त्यामुळे कॅश व्यवहाराला प्राधान्य द्या.
क्राॅस चेक कराच
जेव्हा तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाईन पैशांचा व्यवहार करता. त्यावेळी संबंधित व्यक्तीचे खाते नाव, खाते क्रमांक, UPI आयडी योग्य असल्याची पुष्टी करा. कारण, तुम्ही जर क्राॅस चेक केले नाही तर फसवणूक होण्याची शक्यता असते.
पैशांसाठी QR कोड स्कॅन करणे टाळा
QR कोड फक्त पैसे पाठवण्यासाठी स्कॅन केले जाते. त्यामुळे तुम्हाला कोणी म्हणत असेल, की स्कॅन करा आम्ही पैसे पाठवतो. तर तसे चुकूनही करू नका. तो स्कॅम असू शकतो.
OTP शेअर नका करू
बॅंकेकडून मिळणारा ओटीपी किंवा UPI आयडी कधीही कोणासोबतच शेअर करू नका. तसेच, तुमच्या बॅंक खात्याचा तपशीलही कोणालाच देऊ नका. स्कॅमर तुमच्या बॅंक खात्यात अॅक्सेस मिळवण्यासाठी OTP किंवा अन्य तपशीलाचा वापर करु शकतात.