Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC MCLR Rate: एचडीएफसी बँकेने MCLR दर वाढविले, ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार

HDFC MCLR Rate

Image Source : www.livemint.com

MCLR Rate: एचडीएफसी बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ जाहीर केली. त्याचा परिणाम ग्राहकांच्या गृहकर्ज आणि कार कर्जावर झाल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. बँकेने तिच्या काही मुदतीच्या कर्जांवर बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 15 बेस पॉईंट्स पर्यंत वाढवले ​​आहेत. यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांच्या ईएमआय मध्ये वाढ झाली आहे.

HDFC Bank MCLR Rate Hike: एचडीएफसी बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ जाहीर केली. त्याचा परिणाम ग्राहकांच्या गृहकर्ज आणि कार कर्जावर झाल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. बँकेने तिच्या काही मुदतीच्या कर्जांवर बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 15 बेस पॉईंट्स पर्यंत वाढवले ​​आहेत.

MCLR दर ठरवताना अनेक घटक विचारात घेतले जातात. ज्यात ऑपरेटिंग कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो, ठेव दर, रेपो दर  यांचा समावेश असतो.  MCLR मधील बदलाचा कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम होतो, ज्यामुळे कर्जदाराचा EMI वाढतो.  HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार नवीन MCLR दर 7 जुलै 2023 पासून लागू झाले आहेत.

MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बँकांचा किमान कर्ज दर आहे. या दरापेक्षा कमी दराने बँकांना कर्ज देण्याची परवानगी नाही. एमसीएलआर या नवीन प्रणालीमुळे व्यावसायिक बॅंकांसाठी कर्जाचे दर निश्चित करण्याची पद्धत बदलली. आरबीआयने (RBI) 1 एप्रिल, 2016 रोजी MCLR ही प्रणाली लागू केली. बँका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात, हे निर्धारित करण्यासाठी ही प्रणाली ठरवण्यात आली.

MCLR दरात कितीने वाढ

  1. HDFC बँकेने सर्वसाधारण (Overnight MCLR) MCLR 15 bps ने 8.10 टक्क्यांवरून 8.25 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे.
  2. एक महिन्याचा MCLR 10 bps ने 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांनी वाढविला आहे.
  3. तीन महिन्यांचा MCLR देखील पूर्वीच्या 8.50 टक्क्यांवरून 10 आधार अंकांनी 8.60 टक्क्यांनी वाढविला आहे.
  4. सहा महिन्यांचा MCLR 5 bps ने 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्क्यांनी वाढविला आहे.
  5. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, MCLR 9.05 टक्के आहे, त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.

ईएमआयमध्ये वाढ

MCLR दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरावर दिसेल. आता होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन करीता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. तर नवीन ग्राहकांना जास्त व्याजावर कर्ज मिळेल.