Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gaming in 2022: गेमिंग इंडस्ट्रीमध्ये नवीन ट्रेंड्सची चलती; भारताचे गेमिंग मार्केट 2.6 अब्ज डॉलर्सचे

Gaming Industry Rise in 2022

Gaming in 2022: 2022 हे वर्ष मोबाईल किंवा गॅझेटवर गेम उपलब्ध करून देणाऱ्या इंडस्ट्रीसाठी चांगले गेले असे नक्कीच म्हणता येईल. कारण या वर्षभरात या उद्योगात आणि खेळात बरेच नवीन ट्रेंड आले.

2020 मध्ये कोरोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी मोबाईल आणि इंटरनेटला आपलेसे केले. यामुळे बऱ्याच जणांचा मोबाईलवर गेम खेळण्याचा कल अचानक वाढला आणि यामुळे गेमिंग इंडस्ट्रीमध्ये नवनवीन ट्रेंड उद्यास आले. या गेमिंग इंडस्ट्रीच्या वाढत्या ग्राहकांमुळे ई-स्पोर्ट हा एक प्रकार भारतात बऱ्यापैकी रुजला गेला. 2022 चा विचार केला तर यावर्षी मोबाईल गेमिंग, ई-स्पोर्ट बेटिंग, सोशलायझेशन, एआर/व्हीआर गेम यासारखे ट्रेंड ट्रेंडिंगमध्ये होते.

2022 हे वर्ष मोबाईल किंवा गॅझेटवर गेम उपलब्ध करून देणाऱ्या इंडस्ट्रीसाठी चांगले गेले असे नक्कीच म्हणता येईल. कारण या वर्षभरात या उद्योगात आणि खेळात बरेच नवीन ट्रेंड आले आणि त्याबरोबर जुने ट्रेंड मागेही पडले. ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार, सवयींनुसार नवनवीन गेम तयार केले गेले आणि त्याला ग्राहकांनी रिस्पॉन्सही तसाच दिला.

भारताचा गेमिंग बाजार 2.6 अब्ज डॉलरचा!

भारताचा गेमिंग बाजार 2022 मध्ये अंदाजित 2.6 अब्ज डॉलरचा असून यात दरवर्षी 27 टक्क्यांची वाढ पकडली तर 2027 पर्यंत या इंडस्ट्रीचे भांडवल मूल्य 8.6 बिलिअन डॉलर इतके वाढण्याची अपेक्षा आहे. यातून मोठ्या प्रमाणात महसूल वाढण्याची शक्यता आहे. 2022 या वर्षातील आकडेवारी पाहता भारतात 50.7 कोटीहून अधिक लोक मोबाईल किंवा इतर डिव्हाईसवर गेम खेळतात. यात गेल्यावर्षी 12 टक्क्यांनी वाढ झाली होती. जगभरात भारत आता मोबाईल आणि ऑनलाईन गेमचा मोठा ग्राहक बनला आहे. सध्या भारताची बाजारपेठ अमेरिकेच्या तिप्पट आणि चीनच्या अडीचपट आहे.  

मोबाईल गेमिंग (Mobile Gaming)

2022मध्ये मोबाईल गेमिंगचा मोठा ट्रेंड दिसून आला. मोबाईल गेमिंगचा ट्रेंड हा अनेक वर्षांपासून असला तरी, यावर्षी त्यात अनेक नवनवीन गोष्टी दिसून आल्या. याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या उपलब्ध असलेल्या गेम्समध्ये स्टोरी, गेमप्ले, ग्राफिक्स यांचा ज्या खुबीने वापर केला जात आहे. तो खरंच अफालातून आहे. या इंडस्ट्रीने फक्त तरूण किंवा नवीन पिढीलाच आकर्षित केले नाही, तर जुन्या पिढीतील विशेषत: सिनिअर सिटिजन यांनाही आकर्षित केले.

ई-स्पोर्ट्स बेटिंग (E-Sport Betting)

या वर्षभरात ई-स्पोर्ट इंडस्ट्रीमध्येही चांगलीच वाढ दिसून आली. खासकरून eSport betting ला लोकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. या गेममधून पैज लावून पैसे जिंकण्याची ईर्षा लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात घरबसल्या हे सर्व करता येत असल्याने याला तरूणांकडून चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. सेच यामध्ये फक्त एका गेमवर नाही तर एकाचवेळी अनेक गेमवर पैज लावण्याची सोय आहे. तर काही ई-गेम निर्मात्यांनी यासाठी क्रिप्टोकरन्सीद्वारे पैज लावण्याची संधी ही उपलब्ध करून दिल्याने तरूणाईने हा ट्रेंड डोक्यावर घेतला होता.

गेमिंगद्वारे सोशलायझेशन (Socialization)

गेल्या काही वर्षात गेमिंगद्वारे सोशलायझेशनवर भर दिला जात आहे. कोरोनाच्या काळात सुमारे वर्षभर लोकांना घरात बसून काढावे लागले होते. त्यावेळी लोकांनी गेमिंगच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोविडनंतरच्या काळात असे अनेक गेम उद्यास आले. जे खेळताना एकमेकांशी बोलण्याची संधी देत होते. यातून सोशल कनेक्टीव्हीटी साधण्याचा या इंडस्ट्रीने प्रयत्न केला.

एआर / व्हीआर गेमिंग (AR/VR Gaming)

एआर/व्हीआर हे बऱ्याच वर्षांपासून खेळले जात असले तरी याची अलीकडच्या वर्षभरात पुन्हा एकदा लोकप्रियता वाढली. AR/VR गेममधून खेळणाऱ्याला अनोखा अनुभव मिळत असल्याने हा खेळ खेळणाऱ्यांची संख्या येणाऱ्या काळात वाढू शकते.

गेमिंग इंडस्ट्रीचा हा ट्रेंड असाच वाढत राहिला तर, येणाऱ्या काळात या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच या इंडस्ट्रीमध्ये आणखी काय-काय नवीन बदल पाहायला मिळतील, याची उत्सुकता आहे.