HDFC लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर, HDFC बँक ही जगातील चौथ्या क्रमांकाची आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक ठरली आहे. या बँकेच्या जडणघडणीत ज्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे ते म्हणजे एचडीएफसीचे माजी चेअरमन दीपक पारेख. 1 जुलै 2023 रोजी HDFC च्या विलनिकरणाची प्रक्रिया पार पडली, त्याच्या एक दिवस आधीच दीपक पारेख यांनी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा संचालक मंडळाकडे सुपूर्त केला. त्यांनी बँकिंग क्षेत्रात केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे.
गेली 4 दशकांहून अधिक काळ दीपक पारेख हे HDFC चे काम सांभाळत होते. बँकेच्या चढउताराच्या काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बँकिग क्षेत्रात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. राजीनामा दिल्यापासून पारेख हे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या पहिल्या पगाराचे ऑफर लेटर चांगलेच व्हायरल झाले आहे.
Deepak Parekh hangs up his boots after a 45-year career at #HDFC
— Shilpa S. Ranipeta (@Shilparanipeta) June 30, 2023
? His appointment letter dated July 19, 1978. He joined as Deputy General Manager of HDFC for a basic salary of Rs 3,500
Truly the end of an era!#HDFCMerger pic.twitter.com/9Z7qedifTK
1978 साली दीपक पारेख यांना मिळालेले HDFC चे ऑफर लेटर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. HDFC बँकेत रुजू होताना त्यांची पगारनिश्चिती करण्यात आली होती. या ऑफर लेटरवर 19 जुलै 1978 ही तारीख लिहिलेली आहे. बँकेत डेप्युटी जनरल मॅनेजर पदावर रुजू होताना त्यांना दिलेल्या ऑफर लेटरमध्ये मूळ पगार, डीए व इतर बाबींचा उल्लेख केला आहे.
मूळ पगार 3500 रुपये!
व्हायरल होत असलेल्या ऑफर लेटरनुसार दीपक पारेख यांचा मूळ पगार 3,500 रुपये इतका होता. याशिवाय त्यांना 500 रुपये महागाई भत्ता देखील बँकेकडून देण्यात येत होता. ऑफर लेटरवर बारकाईने नजर टाकली तर पगाराविषयी आणखी डीटेल्स त्यात देण्यात आले आहेत. यानुसार दीपक पारेख यांना घर भाडे भत्ता 15% (HRA Allowance), वाहतून भत्ता 10% (Conveyance Allowance) देण्यात येत होता.
यासोबतच पीएफ, ग्रॅच्युइटी,मेडिकल आदी सुविधांचा देखील लाभ त्यांना त्यांच्या ऑफर लेटरमध्ये देण्याचे नमूद केले आहे. HDFC मधील प्रदीर्घ सेवेनंतर 78 वर्षीय दीपक पारेख यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.