सध्या बऱ्याच बॅंका बचत खात्यावर चांगले व्याज देत आहेत. त्यामुळे बचत खात्यात पैसे टाकण्याचा ओघ वाढवल्यास, काहीच न करता तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. तसेच, काही बॅंका एफडीवर ही चांगले व्याज देत आहेत. पण, त्यांचा कालावधी फिक्स्ड असल्यामुळे त्यातून पैसे काढायला अडचण जाऊ शकते.
त्यापेक्षा बचत खात्यातून व्यवहार करणे सोपे जाते. त्यामुळे बचत खात्यावर चांगला व्याजदर मिळत असल्यास, त्याठिकाणी पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे तुम्ही जर बंधन बॅंकेतील बचत खात्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण, बॅंक 7 टक्के व्याजदर देत आहे.
बचत खात्याचे नवे व्याजदर
बँक सध्या बचत खात्यांवरील 1 लाख रुपयांपर्यंतच्या दैनिक बॅलन्सवर 3 टक्के व्याजदर देत आहे. तेच 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यांवरील दैनिक बॅलन्सवर 6 टक्के व्याजदर मिळत आहे. बँक 10 लाख ते 10 कोटी रुपयांपर्यतच्या दैनिक बॅलन्सवर 7 टक्के व्याज देत आहे.
तसेच, 2 कोटीपेक्षा जास्त आणि 10 कोटी रुपयांपर्यतच्या दैनिक बॅलन्सवर बँक 6.25 टक्के व 10 कोटीपेक्षा जास्त आणि 50 कोटी रुपयांपर्यतच्या दैनिक बॅलन्सवर 6.50 टक्के व्याज देत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार बचत खात्यात पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवू शकता. बॅंकेचे हे नवीन व्याजदर 5 सप्टेंबरपासून लागू आहेत.
असे आहे व्याजाचे कॅल्क्युलेशन
दिवसाच्या शेवटी खात्यातील बॅलन्सच्या आधारावर व्याजाचे कॅल्क्युलेशन केले जाणार आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर वार्षिक 3.00 टक्के व्याज लागू केले जाणार आहे. तसेच, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंतच्या बॅलन्सवर 6 टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे. बॅंक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या बॅलन्सवर 7 टक्के व 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 50 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर 6.50 टक्के वार्षिक व्याजदर देणार आहे.
बॅंकेच्या एफडीचा व्याजदर
बचत खात्यासह तुम्हाला जर बंधन बॅंकेच्या एफडीचा लाभ घ्यायचा असल्यास, तु्म्ही त्याठिकाणीही गुंतवणूक करु शकता. सध्या बॅंक 2 कोटींपेक्षा कमी रकमेवर 7 दिवस आणि 10 वर्षाच्या मुदतीसाठी फिक्स्ड डिपाॅझिटवर 3 टक्के ते 7.85 टक्के व्याज देत आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्याठिकाणी तुम्ही गुंतवणूक करु शकता.