Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business ideas : इकोफ्रेंडली अन् पैसेही मिळवून देईल 'हा' व्यवसाय, वर्षाला कमवा 5 लाख

Business ideas : इकोफ्रेंडली अन् पैसेही मिळवून देईल 'हा' व्यवसाय, वर्षाला कमवा 5 लाख

Business ideas : चांगले पैसे मिळवून देणारा आणि चालणारा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नवी कल्पना घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय इकोफ्रेंडली तर असेलच मात्र योग्य दिशेनं मेहनत केलीस कौशल्याचा योग्य प्रकारे वापर केला तर हा व्यवसाय तुम्हाला पैसेही मिळवून देईल. चला पाहूया...

थर्माकोल (Thermocol) तसंच प्लास्टिकपासून (Plastic) बनवलेल्या प्लेट्स, ग्लासेसचा वापर तुम्ही कधीतरी केला असेल. घरगुती कार्यक्रम तसंच बाहेरचे मोठमोठे समारंभप्रसंगी त्याचा मोठा वापर होतो. मात्र हे साहित्य इको-फ्रेंडली (Eco friendly) नसतं. त्याऐवजी पर्यावरणपूरक पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. सुपारीच्या (Areca) पानांपासून बनवलेल्या कप आणि ताटांचा हा पर्याय आहे. याला मागणीही चांगली आहे. आजकाल बहुतेक ठिकाणी सुपारीच्या पानांच्या प्लेट वापरल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हीही या सुपारीच्या पानांच्या प्लेट्स, वाट्या बनवून चांगली कमाई करू शकता. शिवाय पर्यावरणपूरक असल्यानं या व्यवसायाला संभाव्य अडचणीही नाहीत.

फक्त 87 हजारांपासून सुरू करा व्यवसाय

खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं (KVIC) अरेका लीफ प्लेट मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय. या रिपोर्टनुसार, सुपारीच्या पानांच्या प्लेट मॅन्युफॅक्चरिंग युनिटची किंमत 8.70 लाख रुपये आहे. सुपारीच्या पानांचं प्लेट मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं करायचं असेल तर तुम्हाला फक्त 87 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. उरलेली रक्कम वित्तपुरवठा करता येईल. कर्ज घेता येईल. वर्किंग कॅपसाठी पैसा लागेल. त्यासाठी तुम्हाला वित्तपुरवठा करावा लागेल.

कशा तयार केल्या जातात प्लेट्स?

पानं लांब आणि ताडाच्या आकाराची असतात. त्याची लांबी 1.5-2 मीटर आहे. सुपारीच्या झाडाच्या पानांचं आच्छादन प्लेट बनवण्यासाठी वापरलं जातं. सुपारीची पानं गोळा केली जातात. व्यवस्थित स्वच्छ केली जातात. धुतल्यानंतर त्यांना सुकवणं गरजेचं असतं. नंतर उच्च तापमान आणि दाब वापरून प्लेट्स आणि कपच्या आकारात ती तयार केली जातात.

केव्हीआयसीच्या रिपोर्टमधली आकडेवारी

डिस्पोजेबल प्लेट्स, कप, ट्रे, वाट्या त्याचप्रमाणे अशाच इतर वस्तूंचा वापर रेस्टॉरंट्समध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याशिवाय विविध समारंभात त्याला प्रचंड मागणी असते. केव्हीआयसीच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही 100 टक्के क्षमतेसह सुपारी लीफ प्लेट्स बनवल्या तर वर्षभराच्या कालावधीत 75.73 लाख रुपयांची विक्री करू शकता. पहिल्या वर्षी 50.75 लाख, दुसऱ्या वर्षी 57.81 लाख, तिसऱ्या वर्षी 63.47 लाख, चौथ्या वर्षी 69.84 लाख आणि पाचव्या वर्षी 75.73 लाख रुपये विक्री तुम्ही करू शकता.

दरवर्षी वाढणार नफा

केव्हीआयसीनं जो रिपोर्ट तयार केलाय, त्यात व्यवसाय सुरू करण्यापासून ते निव्वळ नफा या सर्व बाबी ठळकपणे सांगितल्या आहेत. वरील आकडेवारी निष्कर्षाअंती मांडलेली आहे. यात प्रत्येकाचा अनुभव आणि मिळकत किंवा नफा भिन्न असू शकतो. वरचं गणित गृहीत धरल्यास सर्व खर्च वजा जाता तुम्हाला पहिल्या वर्षी 2.59 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. यानुसार तुमचा नफा दरवर्षी वाढणार आहे. दुसऱ्या वर्षी तुम्ही 3.26 लाख रुपये, तिसर्‍या वर्षी 3.74 लाख रुपये, चौथ्या वर्षी 4.29 लाख रुपये आणि पाचव्या वर्षी 4.97 लाख रुपये नफा तुम्ही कमवाल. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि पैसे मिळवून देणाऱ्या या व्यवसायाचा विचार सध्या अनेकजण करताना दिसून येत आहेत.

Source : www.zeebiz.com