Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO Investment: अ‍ॅगिलस डायग्नोस्टिक्स कंपनीचा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज; कंपनी 1.42 कोटी शेअर्स विकणार

Agilus Diagnostics

Image Source : www.twitter.com/agilusDx

IPO Investment: Agilus Diagnostics चे पूर्वीचे नाव SRL Ltd होते. या कंपनीची सुरूवात 1995 मध्ये झाली होती. याच्या एकूण 413 लॅब्स आहेत. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1.42 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहे.

IPO Investment: फोर्टीस हेल्थकेअरच्या मालकी अंतर्गत असलेल्या अ‍ॅगिलस डायग्नोस्टिक्स कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केला आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1.42 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध करून देणार आहे.

Agilus Diagnostics च्या एकूण 413 लॅब्स आहेत. त्यापैकी 43 लॅबला नॅशनल एक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजची (NABL) मान्यता आहे. भारताबाहेरही कंपनीच्या लॅब्स कार्यरत आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्प (29.85 लाख शेअर्स), NYLIM जैकब बॉल्स इंडिया (74.62 लाख शेअर्स) आणि रिसर्जेस पीई इन्वेस्टमेंट लिमिटेड कंपनी (37.86 लाख शेअर्स) आपले शेअर्स विकणार आहे. त्यामुळे या आयपीओतून कंपनीला थेट असा फायदा होणार नाही. आयपीओतून जमा होणार रक्कम थेट शेअरधारकांकडे जाईल.

Agilus Diagnostics चे पूर्वीचे नाव SRL Ltd होते. याची सुरूवात 1995 मध्ये झाली होती. त्याचे मुख्यालय गुरग्राममध्ये आहे. मार्च, 2023 पर्यंत उपलब्ध असेलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या देशभरातील 25 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेंटर्स आहेत. ही भारतातील एक नावाजलेली लॅब चैन आहे. कंपनीने 2023 मध्ये जवळपास 3.9 कोटी टेस्ट केल्या आहेत. तर भारत आणि भारताबाहेर एकूण 1.66 कोटी रुग्णांना आपली सेवा दिली आहे.