बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार कोसळला. सलग तिसऱ्या शेअर बाजार लाल चिन्हावर बंद झाला. यातही बुधवारी मोठी घसरण बघायला मिळाली. कारण हिंडनबर्गच्या अहवालाच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या Adani Group ला आणखी एक धक्का मिळाला आहे. याचा अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाल्याचे बघायला मिळाले. परिणामी सेन्सेक्समध्येही मोठी घसरण झाली.
काय आहे विकिपीडीयाचा गौप्यस्फोट ?
विकिपीडियावर विविध प्रकारची माहिती, लेख असतात हे आपल्याला माहीत आहे. आपण अनेकदा गुगल सर्च इंजिनवर काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि कित्येकदा आपल्यासमोर येणाऱ्या रिजल्ट पेजवर विकिपीडियाचा लेख किवा माहिती दिसते. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुप, त्यांच्या कंपन्या, त्यातला कारभार हे सगळ जाणून घेण्याचा गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू लागले. कारण मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या अदानी ग्रुपच्या शेअर्सशी संबंधित आहेत. या पार्श्वभूमीवर विकिपीडीयावरील माहितीही मोठ्या प्रमाणात वाचली जात आहे. आणि महत्वाचे म्हणजे, या साईटवरील वापरकर्ता (युजर) माहितीत भर घालू शकतो. यावरील कंटेन्ट हा आपल्यासारख्या यूजर्सने तयार केलेला असतो.
आता अदानी ग्रुपवर विकिपीडियाने आक्षेप असा घेतला आहे की, अदानी ग्रुपशी संबंधित जे लेख आहेत त्यात बदल केले गेले आहेत. आणि हा मजकूर न्यूट्रल नाही. तो ग्रुपने पीआर (public relation) च्या माध्यमातून केला आहे. कंपनीची जनमानसातील प्रतिमा चांगली राखणे किवा सुधारणे हे पब्लिक रिलेशनचे सामान्यपणे उद्दिष्ट असते. अदानी आणि त्यांच्या कर्मचार्यांनी विकिपीडियाला संबंधित विकिपीडिया लेखांच्या नॉन-न्यूट्रल पीआर आवृत्त्यांसह विकिपीडियाला जोडण्याचा प्रयत्न केला असे विकिपीडियाने सांगितल्यानंतर याचा अदानी ग्रुपच्या शेअर्सवर परिणाम झाल्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. विकिपीडियाच्या मते, 40 हून अधिक सॉक पपेट्स किंवा अघोषित सशुल्क संपादक ज्यांना नंतर अवरोधित केले गेले आहे, त्यांनी अदानी कुटुंब आणि त्यांच्या कौटुंबिक व्यवसायावरील नऊ संबंधित लेख सुधारित केले आहेत. यातून हिंडनबर्ग अहवालानंतर आपली ढासळत चाललेली प्रतिमा सुधारण्याचा अदानी ग्रुपकडून प्रयत्न होत असल्याचे सूचित करण्यात येत आहे. परिस्थिती गंभीर झाल्यापासून अदानी कर्जाची पूर्वफेड करून गुंतवणूकदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहेत.
या सगळ्याचा अदानी ग्रुपच्या शेअर्सवर परिणाम झाल्याचे विश्लेषक सांगतात. बुधवारी सर्व 10 समभाग घसरले. यामुळे गुंतवणूकदारांचे 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर आणि अदानी ग्रीन 5 टक्के लोअर सर्किट मर्यादेत लॉक होते. समूहाचे बाजार भांडवल 100 अब्ज डॉलरच्या खाली गेले कारण अधिक ट्रेडर्सनी समूहाचे समभाग विकण्यास सुरुवात केली. गेल्या महिन्यात समभागांनी त्यांचे मूल्य 60 टक्के गमावले. 24 जानेवारीपासून जेव्हा यूएस-आधारित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आपला अहवाल प्रसिद्ध केला तेव्हापासून पडझड होत आहे. अदानी समूह स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीत गुंतला असल्याचा आरोप करण्यात आला होता.समूहाच्या समभागांना या सगळ्याचा मोठा फटका बसला आहे. अदानी समूहाने हा दावा निराधार असल्याचे म्हटले असले तरी कंपनीला बाजाराची खात्री पटवून देण्यात मदत झाली नाही. सर्व 10 समभागांचे एकत्रित बाजार भांडवल 11.5 लाख कोटी ते 7.69 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान कमी झाले आहे.
सेन्सेक्समध्ये बुधवारी मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्या 2 दिवसाप्रमाणेच सेन्सेक्स बुधवारीही लाल चिन्हासह बंद झाला. भू-राजकीय तणाव आणि दीर्घकाळापर्यंत उच्च व्याजदरांवरील चिंतेमुळे प्रमुख इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग चौथ्या सत्रात घसरले. सत्रादरम्यान सेन्सेक्स 900 अंकांपेक्षा अधिक घसरला तर निफ्टीनेही सत्रादरम्यान 17,600 स्तरावरील सपोर्ट तोडले. BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 261.4 लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या 4 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,500 अंकांनी घसरला आहे.